'जवान'मधलं पहिलं गाणं 'जिंदा बंदा...' रिलीज, साउथ स्टाईलमध्ये थिरकताना दिसला किंग खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 18:52 IST2023-07-31T18:52:12+5:302023-07-31T18:52:38+5:30
Shah Rukh Khans Jawan : शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'जवान' या चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. 'जिंदा बंदा है' असे या गाण्याचे नाव आहे.

'जवान'मधलं पहिलं गाणं 'जिंदा बंदा...' रिलीज, साउथ स्टाईलमध्ये थिरकताना दिसला किंग खान
शाहरुख खानने आज म्हणजेच ३१ जुलै रोजी चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. खरंतर आज किंग खानच्या बहुप्रतिक्षित 'जवान' या चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. 'जिंदा बंदा है' असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणे केवळ हिंदीतच प्रदर्शित झाले नाही तर त्याचे तामिळ आणि तेलुगू आवृत्त्याही प्रदर्शित होणार आहेत. या गाण्यानंतर शाहरुख खानचे चाहते खूप उत्सुक आहेत. कारण या गाण्यात शाहरुखच्या व्यक्तिरेखेचा आणखी एक रंग पाहायला मिळाला आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या व्हिडिओमध्ये शाहरुखने शेवटी स्वतःला खलनायक म्हटले आहे.
साऊथचे दिग्दर्शक एटली यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटात किंग खान पूर्ण अॅक्शन अवतारात दिसत आहे. अॅक्शन व्यतिरिक्त, हे त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वात अनोखे पात्र मानले जाते. करिअरच्या सुरुवातीला किंग खानने डर आणि बाजीगर यांसारख्या चित्रपटांमध्ये ग्रे कॅरेक्टर्स केल्या आहेत, मात्र 'जवान'मधील त्याच्या भूमिकेबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही.
टीम जवान बद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खान व्यतिरिक्त साउथ स्टार नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, योगी बाबू यांचा समावेश आहे. एकूणच, या चित्रपटात दक्षिणेकडील स्टार्स आणि हिंदी चित्रपटातील कलाकारांचा जबरदस्त कॉम्बो आहे. यामुळेच हिंदी पट्ट्यात या चित्रपटाची जेवढी क्रेझ आहे, तेवढीच उत्सुकता दक्षिणेतही आहे. याचे एक कारण म्हणजे नयनतारा प्रेग्नेंसीनंतर या चित्रपटातून कमबॅक करत आहे.