First Poster Release : श्रद्धा कपूर-अर्जुन कपूरविनाच ‘हाफ गर्लफ्रेंड’ची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 22:27 IST2017-02-14T16:56:43+5:302017-02-14T22:27:35+5:30

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या बहुचर्चित ‘हाफ गर्लफें्रड’ या सिनेमाचे पहिले टिझर पोस्टर नुकतेच रिलिज करण्यात आले ...

First Poster Release: Shraddha Kapoor - A glimpse of Arjun Kapoor's 'Half Girlfriend' | First Poster Release : श्रद्धा कपूर-अर्जुन कपूरविनाच ‘हाफ गर्लफ्रेंड’ची झलक

First Poster Release : श्रद्धा कपूर-अर्जुन कपूरविनाच ‘हाफ गर्लफ्रेंड’ची झलक

िनेत्री श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या बहुचर्चित ‘हाफ गर्लफें्रड’ या सिनेमाचे पहिले टिझर पोस्टर नुकतेच रिलिज करण्यात आले आहे. या पोस्टरचे वैशिष्ट्य म्हणजे यावर श्रद्धा किंवा अर्जुनचा फोटो नसून केवळ सिनेमासंबंधीच्या काही गोष्टी उघड करण्यात आल्या आहेत. हे पोस्टर #halfgirlfriend #filmfact1 या हॅशटॅगने रिलिज करण्यात आले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून श्रद्धाच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या सिनेमाविषयी उत्सुकता लागली आहे. सिनेमामध्ये श्रद्धाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे अगोदरच स्पष्ट करण्यात आल्याने, तिच्या फॅन्समध्ये सिनेमाविषयी कमालीची उत्सुकता आहे. पोस्टरमध्ये बास्केटबॉल कोर्ट अतिशय लक्षवेधी पद्धतीने दाखविण्यात आले असून, एनबीए या विश्वविख्यात बास्केटबॉल एनबीए या विश्वविख्यात बास्केटबॉल लीगविषयीची माहिती या पोस्टरवर देण्यात आली आहे. 

सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. हा सिनेमा १९ मे ला प्रदर्शित होणार आहे. श्रद्धा, अर्जुनच्या या आगामी चित्रपटाचे कथानक प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या पुस्तकावर आधारलेले असून, या सिनेमामध्ये अर्जुन कपूर एका सर्वसामान्य बिहारी तरु णाच्या भूमिकेत दिसणार आहे. जो दिल्लीच्या एका श्रीमंत तरु णीच्या प्रेमात पडतो. त्यामुळे आता या दोघांच्या प्रेमाचा बॉल बास्केटमध्ये जाण्यात यश मिळवणार का हे येत्या काळात स्पष्ट होईलच. 

दरम्यान, सिनेमाचे पहिले पोस्टर रिलिज केल्याने आता या सिनेमाविषयीच्या आणखी काही गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहचविल्या जाण्याची शक्यता आहे. येत्या काळात श्रद्धा आणि अर्जुन यांनाही पोस्टरवर स्थान दिले जाऊ शकते.