अजय देवगनच्या बादशाहोचे पहिले पोस्टर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 17:31 IST2017-06-13T12:01:57+5:302017-06-13T17:31:57+5:30
बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या मोस्ट अवेटेड चित्रपट बादशाहो चे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सोमवारी चित्रपटचे टीजर पोस्टर ...

अजय देवगनच्या बादशाहोचे पहिले पोस्टर आऊट
ब लिवूड अभिनेता अजय देवगनच्या मोस्ट अवेटेड चित्रपट बादशाहो चे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सोमवारी चित्रपटचे टीजर पोस्टर रिलीज करण्यात आले होते. या नव्या पोस्टरमध्ये अजय देवगनच्या तोंडावर कपडा बांधलेला आहे. लेदर जॅकेट घातलेल्या अजयच्या हातात बंदूकसुद्धा आहे. अजयने स्वत: हे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे.
पोस्टर बघून अंदाजाता लावण्यात येतो आहे चित्रपट अॅक्शनने भरपूर असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुधरिया करतोय. रजत अरोराने चित्रपटाची कथा लिहिली आहे. चित्रपटात अजय देवगन, इलियाना डिक्रूज, इशा गुप्ता आणि विद्युत जामवाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. सनी लिओनीचे स्पेशल डान्स नंबर या चित्रपटात आहे. अंकित तिवारीने या चित्रपटाचे संगीत दिले आहे. 1 सप्टेंबरला बादशाहो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय आणि मिलन यांच्या जोडीने याआधी ही बरेच हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. कच्चे धागे, चोरी चोरी आणि वंस अपॉन अ टाइम इन मुंबई सारखे चित्रपट या जोडीने एकत्र केले आहेत. हा यांच्या जोडीचा चौथा चित्रपट आहे. , '1975 की इमरजेंसी... 96 घंटे... 600 किलोमीटर... 'बादशाहो' की आंधी जल्द आ रही है।' असे या पोस्टरवर लिहिले आहे.