पहिले प्रेम..रॅपस्टार टुपॅक शकूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 02:03 IST2016-01-16T01:20:00+5:302016-02-12T02:03:57+5:30
'जिमी किमेल लाईव्ह' या शो दरम्यान तिने हा खुलासा केला. शालेय जीवनात तिचा रॉकस्टार टुपक शकूरवर जीव जडला होता ...
.jpg)
पहिले प्रेम..रॅपस्टार टुपॅक शकूर
' ;जिमी किमेल लाईव्ह' या शो दरम्यान तिने हा खुलासा केला. शालेय जीवनात तिचा रॉकस्टार टुपक शकूरवर जीव जडला होता असे तिने सांगितले. 'क्वान्टिको' या मालिकेच्या प्रमोशनसाठी ती या शोमध्ये आली होती. अमेरिकेत प्रसिद्ध असलेल्या या शोमध्ये आल्यावर प्रियंका काय बोलणार याकडे सेलेब दुनियेची नजर लागली होती. 'क्वान्टिको' मालिके विषयी चर्चा करीत असताना किमेलने प्रियंकाच्या खाजगी आयुष्याबद्दल विचारले. प्रियंकाला शालेय युनिफॉर्म घालण्याचा तिटकारा होता असे ती म्हणाली, शिवाय पुरुषांविषयीची अनामिक हुरहुर या विषयावरही या शोमध्ये गप्पा झाल्यात. यात भाग घेताना प्रियंका म्हणाली, अमेरिकेतील लोकप्रिय रॅपस्टार आणि अभिनेता टुपॅक शकूरच्या प्रेमात मी शालेय वयातच पडले. हे माझे पहिले प्रेम होते. त्यानंतर या पहिल्या प्रेमाची जागा माजी बास्केटबॉल स्टार डेनिस रॉडमॅन याच्या प्रेमाने घेतली.या शोमध्ये हॉलिवूड अभिनेता मॅट डॅमनही त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. कार्यक्रम अमेरिकेत एबीसी नेटवर्क या चॅनलवर प्रसारित झाला. भारतामध्ये आज ३ ऑक्टोबरला हा शो प्रसारीत होणार आहे.