First Look out : ​श्रीदेवी बनणार ‘मॉम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 09:49 IST2017-03-14T04:18:08+5:302017-03-14T09:49:04+5:30

गौरी शिंदे दिग्दर्शित ‘इंग्लिश-विंग्लिश’च्या धमाकेदार यशानंतर अभिनेत्री श्रीदेवी पुन्हा एकदा एका आगळ्या-वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. होय, पती ...

First Look out: 'Mother' will become Sridevi | First Look out : ​श्रीदेवी बनणार ‘मॉम’

First Look out : ​श्रीदेवी बनणार ‘मॉम’

री शिंदे दिग्दर्शित ‘इंग्लिश-विंग्लिश’च्या धमाकेदार यशानंतर अभिनेत्री श्रीदेवी पुन्हा एकदा एका आगळ्या-वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. होय, पती बोनी कपूर यांच्या ‘मॉम’ या सिनेमात श्रीदेवी लीड रोलमध्ये आहे. श्रीदेवीच्या ‘मॉम’ची  बरीच प्रतीक्षा होती. अखेर या चित्रपटाचा फर्स्ट लूक अर्थात पहिले पोस्टर आज जारी करण्यात आले. या पोस्टरमध्ये श्रीदेवी अतिशय गंभीर मुद्रेत दिसत आहे. त्यावर ‘आई’ हा शब्द वेगवेगळ्या भाषेत लिहिले गेले आहे. हे पोस्टर बघता, ‘मॉम’ हा चित्रपट एका धाडसी आईची कथा असल्याचे वाटते.
 


twitterवर ‘मॉम’चे हे पोस्टर जारी होताच, काही तासांत त्याला ४० हजारांवर लाईक्स मिळाले. लाखो लोकांनी हे पोस्टर रिटिष्ट्वट केले. रवी उदयावर दिग्दर्शित या चित्रपटात श्रीदेवीसोबत सजल अली, अक्षय खन्ना, अदनान सिद्दीकी आणि अभिमन्यू सिंह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मॉम’ हा चित्रपट हिंदीच नाही तर तामिळ आणि तेलगू भाषेतही रिलीज होणार आहे. या वर्षी १४ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

 मुलगी जान्हवी कपूर हिच्या वाढदिवशी श्रीदेवीने ‘मॉम’ या चित्रपटाची घोषणा केली होती. ८० च्या दशकामध्ये एकापेक्षा एक सरस चित्रपट देऊन श्रीदेवीने बॉलीवुडमध्ये तिचे वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. अनिल कपूर सोबत तिची जोडी तर हिट ठरली होती. त्यानंतर ती बोनी कपूर यांच्याशी विवाहबद्ध झाली अन सोबत चित्रपटसृष्टीत दिसेनासी झाली. अर्थात तब्बल पंधरा वर्षांनंतर तिने ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटातून पुनरागमन केले अन् चाहत्यांची मने जिंकली. आता श्रीदेवी पुन्हा तिचा जलवा मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. 

 
 

Web Title: First Look out: 'Mother' will become Sridevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.