रणबीर कपूर- दीपिका पादुकोण पुन्हा ‘साथ-साथ’! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 16:50 IST2019-03-03T16:50:13+5:302019-03-03T16:50:55+5:30

दीपिका व रणबीर दोघेही आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत. खरे तर ब्रेकअपनंतर स्टार्स एकमेकांकडे पाहणेही पसंत करत नाहीत. पण रणबीर व दीपिका मात्र याला अपवाद आहेत.

first glimpse of deepika padukone and ranbir kapoor adfilm | रणबीर कपूर- दीपिका पादुकोण पुन्हा ‘साथ-साथ’! पाहा, फोटो!!

रणबीर कपूर- दीपिका पादुकोण पुन्हा ‘साथ-साथ’! पाहा, फोटो!!

ठळक मुद्दे एकत्र काम करण्याबद्दल रणबीर व दीपिकाला जशी अडचण नाही, तशीच दीपिकाचा पती रणवीर सिंग यालाही नाही. अलीकडे एका मुलाखतीत रणवीर यावर बोलला होता.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणबीर कपूर यांचे ब्रेकअप प्रचंड गाजले. या ब्रेकअपनंतर दीपिका डिप्रेशनमध्येही गेली. यातून सावरायला तिला बराच वेळ लागला. पण आता दीपिका व रणबीर दोघेही आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत. खरे तर ब्रेकअपनंतर स्टार्स एकमेकांकडे पाहणेही पसंत करत नाहीत. पण रणबीर व दीपिका मात्र याला अपवाद आहेत. इतके काही घडूनही दोघांची मैत्री आजही कायम आहे. केवळ पर्सनल आयुष्यात नाही तर प्रोफेशनल आयुष्यातही ही मैत्री टिकून आहे. त्यामुळेच ब्रेकअपनंतरही इम्तियाज अलीच्या ‘ये जवानी है दीवानी’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले. अलीकडे दोघांनीही एका जाहिरातीचे शूटींग पूर्ण केले. तूर्तास या शूटचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत रणबीर व दीपिकाची स्पेशल केमिस्ट्री स्पष्टपणे दिसते. दीपिकाच्या फॅन क्लबने हा फोटो शेअर केला आहे. कॉफीच्या एका ब्रँडसाठी रणबीर व दीपिका एकत्र आलेत.




 एकत्र काम करण्याबद्दल रणबीर व दीपिकाला जशी अडचण नाही, तशीच दीपिकाचा पती रणवीर सिंग यालाही नाही. अलीकडे एका मुलाखतीत रणवीर यावर बोलला होता. रणबीर व दीपिकाने एकत्र काम केल्यामुळे मला काहीही फरक पडत नाही. माझ्या मनात क्षणभरही असुरक्षिततेची भावना येत नाही. याचे कारण म्हणजे, मी दीपिकावर जसे आणि जितके प्रेम करू शकतो, तितके प्रेम अन्य कुणीच करू शकत नाही. मी जसा आहे, जे काही आहे, सुरक्षित व्यक्ति आहे, असे तो म्हणाला होता. केवळ इतकेच नाही तर भविष्यात मलाही रणबीरसोबत काम करायला आवडेल, असेही रणवीरने सांगितले होते.

Web Title: first glimpse of deepika padukone and ranbir kapoor adfilm