first crush that crashed : सलमान अखेर बोलला, तिलाच नाही तर तिच्या कुत्र्यालाही मी आवडायचो नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2017 13:10 IST2017-06-05T07:39:35+5:302017-06-05T13:10:54+5:30
सलमान खानच्या लव्ह लाईफबद्दल अनेक कथा-कहाण्या आपण ऐकल्या आहेत. पण यात एक गोष्ट अगदी खरी आहे, ती म्हणजे सलमान ...

first crush that crashed : सलमान अखेर बोलला, तिलाच नाही तर तिच्या कुत्र्यालाही मी आवडायचो नाही!
स मान खानच्या लव्ह लाईफबद्दल अनेक कथा-कहाण्या आपण ऐकल्या आहेत. पण यात एक गोष्ट अगदी खरी आहे, ती म्हणजे सलमान खान हा अतिशय भावूक व्यक्ती आहे. अतिशय संवेदनशील माणूस आहे. तेवढाच तो परखडही आहे. मनात असले नसले ते बोलून टाकायचे. कुठलेही डिप्लोमॅटीक उत्तर नाही, कुठलीही लपवाछपवी नाही. असाच अलीकडे सलमान व्यक्त झाला. त्याच्या पहिल्या पे्रमाबद्दल तो बोलला.
आजपर्यंत सलमान कधीही त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल बोलला नव्हता. त्याचे अनेक अफेअर्स झालेत. पण एका मुलीच्या प्रेमात तो आकंठ बुडाला होता. तेही वयाच्या सोळाव्या वर्षी. आजही सलमान हे पहिले प्रेम विसरू शकलेला नाही, असेच दिसतेय. कारण याबद्दल बोलताना सलमान बराच भावूक झाला होता. होय, एका मुलाखतीत सलमानने त्याच्या फर्स्ट क्रशबद्दल सांगितले. मी १६ वर्षांचा होतो आणि त्यावेळी एक मुलगी होती. ती मला प्रचंड आवडायची. पण माझ्या मनातल्या भावना तिला सांगण्याची माझी कधीच हिम्मत झाली नाही. तिने नकार दिला तर, या विचारानेच मी घाबरायचो. ती माझी मैत्रिण होती. पण बॉयफ्रेन्ड म्हणून मी तिची चॉईस नव्हतो. माझ्या दोन मित्रांसोबत तिने डेट केले. यादरम्यान माझी स्थिती मलाच माहिती. पण त्यावेळी तिला त्याची भणकही नव्हती. कदाचित मी तिच्यावर खूप प्रेम करतो, हे पुढे तिला कळले होते. पण तिला माझ्यात रस नव्हताच, असे सलमानने सांगितले.
ALSO READ : सलमान खानने म्हटले; ‘माझ्यामुळेच माझ्या भावांना इंडस्ट्रीत डावलले’
पुढेही त्याने बरेच काही सांगितले. तो म्हणाला, ‘तिच्याकडे एक मोठा कुत्रा होता. त्याला नियंत्रित करणे खूप कठीण होते. तो कुत्रा मला एकदिवस चावायला उठला. मी ही त्याच्यावर हात उगावला. पण याचवेळी ती माझ्यावर जोराने ओरडली. त्यावेळी ती माझ्यासाठी नाहीच. सगळे संपले, हे मला कळून चुकले. तिला मी आवडत नव्हतो. तिच्या कुत्र्यालाही मी आवडायचो नाही. तिचे कुटुंब तर बरेच नंतर येते. त्या घटनेनंतर मी प्रचंड दु:खी झालो होतो. स्वत:ला संपवून टाकावे, असे मला वाटू लागले होते. पण कालांतराने सगळे ठीक झाले. गेल्या ३५ वर्षांत मी तिला भेटलेला नाही. मला खात्री आहे, ती नक्कीच आनंदात असेल’.