n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">करण जोहरच्या ' ऐ दिल है मुश्किल' या आगामी सिनेमात फवाद खानची भूमिका असल्याने तो सिनेमा अडचणीत सापडला आहे. तर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या बहुचर्चित ' रईस' या सिनेमातही पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान झळकणार असल्याने त्याला अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता दिसत आहे. आता 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये फवादऐवजी सैफ झळकणार असल्याची चर्चा आहे. फवाद पाकिस्तानात परत गेल्याने या चित्रपटा संदर्भात जोरदार चर्चा रंगल्या होत्या. चित्रपट प्रदर्शित हाणार कि नाही याकडे बºयाचजणांचे लक्ष लागलेले होते. परंतु या सिनेमात फवाद खानची भूमिका सैफ करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा चित्रपट लांबणीवर पडला आहे. एवढेच नाही तर या सिनेमातील फवादने साकारलेल्या भूमिकेसाठी सैफ अली खानला करण जोहरची पहिली पसंती होती. मात्र ऐनवेळी सैफऐवजी फवादची वर्णी सिनेमात लागली. असेही सध्या बोलले जात आहे.