छेडखानी प्रकरणी मिकाविरूद्ध एफआयआर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 22:02 IST2016-07-05T16:32:37+5:302016-07-05T22:02:37+5:30
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंह पुन्हा एकदा वांद्यात सापडला आहे. मुंबईच्या एका फॅशन डिझाईनरने मिकावर छेडखानी केल्याचा आरोप केला ...

छेडखानी प्रकरणी मिकाविरूद्ध एफआयआर
ब लिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंह पुन्हा एकदा वांद्यात सापडला आहे. मुंबईच्या एका फॅशन डिझाईनरने मिकावर छेडखानी केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी वर्सोवा ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मिकाविरूद्ध भादंवीच्या कलम ३५४(महिलेचा विनयभंग),कलम ३२३(इजा पोहोचवणे) आणि कलम ५०४(धमकावणे) आदी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित फॅशन डिझाईनर मिकाच्या परिचयाची होती. मिकाने आपल्यासोबत गैरवर्तन करून इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तिने केला आहे.