हॉटेलच्या उद्घाटनाला जाणे रवीना टंडनला पडले महाग, एफआयआर दाखल!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 14:08 IST2018-11-15T14:06:38+5:302018-11-15T14:08:20+5:30
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. होय, रवीनाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

हॉटेलच्या उद्घाटनाला जाणे रवीना टंडनला पडले महाग, एफआयआर दाखल!!
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. होय, रवीनाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका रहदारीच्या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.
प्रकरण आहे बिहारातील. रवीना एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी बिहारात गेली होती. पण बिहारला जाणे रवीनाला चांगलेच महागात पडले. रवीना येणार म्हटल्यावर तिच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली. रवीनाची एक झलक पाहण्यासाठी सगळे आतूर झाले. मग काय, हॉटेलबाहेरच्या रस्त्यांवर मोठा जाम लागला. अनेक जण या ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडले. यापैकीच एक होते पेशाने वकील असलेले सुधीर ओझा. सुधीर ओझा या ट्रॅफिक जाममुळे इतके वैतागले की, त्यांनी थेट रवीनाविरोधात न्यायालयात धाव घेतली. रवीनाच्या या कार्यक्रमामुळे अनेक लोक ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडले, असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या तक्रारीची दखल घेत, न्यायालयाने पोलिसांना रवीनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिलेत. न्यायालयाच्या या आदेशानंतर काजी मोहम्मदपूर ठाण्यात अभिनेत्रीविरोधात काजी गुन्हा दाखल करण्यात आला.
रवीनाच्या कामाबद्दल सांगायचे तर अलीकडे तिचा ‘मातृ’ हा सिनेमा रिलीज झाला होता. पण बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. तूर्तास रवीनाने कुठलाही नवा चित्रपट साईन केलेला नाही. लवकरच ती एका वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. ही वेबसीरिज रवीनाने स्वत: लिहिली आहे.