हृतिक रोशनची एक्स वाइफ सुजैन खानवर का आली पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची वेळ, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 17:24 IST2020-12-12T17:23:58+5:302020-12-12T17:24:35+5:30
हृतिक रोशनची एक्स वाइफ सुजैन खानला पोलीस स्टेशनमध्ये जाताना पाहून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

हृतिक रोशनची एक्स वाइफ सुजैन खानवर का आली पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची वेळ, जाणून घ्या याबद्दल
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची एक्स वाइफ सुजैन खान शनिवारी सकाळी मुंबईतील वांद्रे पोलीस स्टेशन बाहेर पहायला मिळाली. सुजैनसोबत तिची टीम आणि पोलीस ऑफिसर होते जे तिला पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन गेले. या दरम्यान सुजैनच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेण्यात आली होती. यावेळी तिने मास्क लावला होता. सुजैन पोलीस स्टेशनला रिकंस्ट्रक्शनच्या मॉनिटरिंग साठी गेली होती.
सुजैन खान प्रोफेशनने इंटेरिअर डिझायनर आहे. वांद्रे पोलिस स्टेशनची बिल्डिंग पुन्हा डेव्हलप करायची आहे. ज्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी सुजैन खानला वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये बोलवले होते. तिथे आयपीएस अधिकारी अभिषेक सिंग यांच्यासोबत तिला पाहिले गेले.
सुजैन खान सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती तिच्या जीवनाशी निगडीत अपडेट्स सोशल मीडियावर देत असते. सुजैन हृतिक रोशन सोबत भलेही विभक्त झाली असली तरी मुलांसाठी बऱ्याचदा ते एकत्र दिसतात. लॉकडाउनमध्ये मुलांची काळजी घेण्यासाठी सुजैन हृतिकच्या घरी थांबली होती. हृतिकसोबत आजही तिचे खूप चांगले बॉण्डिंग आहे.
हृतिक व सुजैनने 2000 साली लग्नबेडीत अडकले होते. लग्नाच्या 13 वर्षानंतर त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांचा निर्णय ऐकून त्यांच्या चाहत्यांना खूप धक्का बसला होता. सुजैनने घटस्फोटाच्या दोन वर्षानंतर यामागचं कारण सांगितलं होतं. सुजैनने फेमिनाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही जीवनाच्या या स्टेजवर येऊन पोहचले होतो जिथे एकत्र राहण्याऐवजी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. चुकीच्या नात्यात राहण्याऐवजी याबद्दल माहित होणे गरजेचे होते.
सुजैनने पुढे सांगितले की, आमचे लग्न तुटले पण माझे व हृतिकमध्ये चांगले बॉण्डिंग आहे. आम्ही मुलांसाठी नेहमीच कमिटेड राहणार आहे. आम्ही चांगले फ्रेण्ड आहोत. आम्ही खूप बोलायचो पण आता एकत्र वेळ व्यतित करत नाही. पण, आमच्या मुलांसाठी आम्ही कमिटिड आहेत. आम्ही एकमेकांचा आदर ठेवतो. जेव्हा आम्ही मुलांसोबत असतो. त्यावेळी आम्ही आमच्या नात्यातील कटूता विसरून एक होतो.