अखेर प्रतीक्षा संपली! या दिवशी रिलीज होणार हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण 'फायटर'चा टीझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 19:13 IST2023-12-07T19:13:22+5:302023-12-07T19:13:54+5:30

Fighter Movie: 'फायटर' चित्रपटातून हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ही जोडी रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

Finally the wait is over! The teaser of Hrithik Roshan and Deepika Padukone's 'Fighter' will be released on this day | अखेर प्रतीक्षा संपली! या दिवशी रिलीज होणार हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण 'फायटर'चा टीझर

अखेर प्रतीक्षा संपली! या दिवशी रिलीज होणार हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण 'फायटर'चा टीझर

हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणचा आगामी एरियल अ‍ॅक्शन चित्रपट 'फायटर' बद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा ऐकायला मिळत आहे. या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. चाहत्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी निर्मात्यांनी आता चित्रपटाचा टीझर लवकरच रिलीज केला जाणार आहे. नुकतेच दोन्ही कलाकारांच्या लूक सादर करण्यात आले. त्यानंतर आता टीझरचा एक अनाउंसमेंट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. चित्रपटाचा टीझर उद्या, शुक्रवार, ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शित होणार आहे. या घोषणेनंतर चाहते खूप उत्सुक दिसत आहेत.

फायटर चित्रपटाद्वारे हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. त्यांची जोडी पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या एरियल अ‍ॅक्शन चित्रपटात अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थचा हृतिकसोबतचा हा तिसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी 'वॉर', 'बँग बँग'मध्ये एकत्र काम केले आहे. फायटर हा हृतिक रोशनचा पहिला थ्रीडी चित्रपट आहे, ज्याबद्दल तो खूप उत्सुक आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी २५ जानेवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हृतिक आणि दीपिका दिसणार दमदार भूमिकेत 
पोस्टरमध्ये हृतिक आणि दीपिकाचा हा लूक पाहून चाहते खूपच प्रभावित झाले आहेत. या चित्रपटात दीपिका स्क्वाड्रन लीडर मीनल राठोडच्या भूमिकेत दिसणार आहे. तर हृतिक स्क्वाड्रन पायलट 'शमशेर पठानिया' उर्फ ​​'पॅटी'च्या भूमिकेत दिसणार आहे.
 

Web Title: Finally the wait is over! The teaser of Hrithik Roshan and Deepika Padukone's 'Fighter' will be released on this day