​अखेर रणबीर कपूरने केला खुलासा; ‘या’ तारखेला येणार ‘जग्गा जासूस’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 10:00 IST2017-04-12T04:30:36+5:302017-04-12T10:00:36+5:30

रणबीर कपूर व कॅटरिना कैफ या दोघांचा ‘जग्गा जासूस’ हा सिनेमा रिलीज व्हायला उणापुरा दोन वर्षांचा काळ लागलायं. लोकांची ...

Finally Ranbir Kapoor disclosed; 'Jagga spy' will come to date! | ​अखेर रणबीर कपूरने केला खुलासा; ‘या’ तारखेला येणार ‘जग्गा जासूस’!

​अखेर रणबीर कपूरने केला खुलासा; ‘या’ तारखेला येणार ‘जग्गा जासूस’!

बीर कपूर व कॅटरिना कैफ या दोघांचा ‘जग्गा जासूस’ हा सिनेमा रिलीज व्हायला उणापुरा दोन वर्षांचा काळ लागलायं. लोकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता कमी होण्यास कदाचित हेच कारण आहे. पण अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख निश्चित करण्यात आली आहे. होय, अनुराग बसू दिग्दर्शित हा चित्रपट येत्या १४ जुलैला रिलीज होणार आहे. काल मुंबईत रंगलेल्या लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्यात रणबीरने खुद्द हा खुलासा केला. ‘जग्गा जासूस’च्या रिलीजची ही अंतिम तारिख आहे. यानंतर ती लांबणीवर टाकली जाणार नाही, असे रणबीरने यावेळी सांगितले.

रणबीर व कॅटरिनाच्या ब्रेकअपनंतरचा हा त्यांचा पहिला एकत्र केलेला सिनेमा असेल. प्रारंभी या दोघांच्या ब्रेकअपमुळे हा चित्रपट रखडला. यानंतर गत ७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. पण काही गाणी आणि काही दृश्यांच्या शूटींगमुळे चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली. खरे तर ब्रेकअपनंतर कॅट व रणबीरची आॅनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यास लोक उत्सूक आहेत. त्यामुळेच आता हा चित्रपट लवकरात लवकर रिलीज होणे अपेक्षित आहे.

ALSO READ : ​संजय दत्त अन् रणबीर कपूरच्या रंगू लागल्या मैफली!!

या चित्रपटात तब्बल २९ गाणी आहेत, हे आपल्याला माहित आहेच. एकंदर काय तर, हा एक म्युझिकल चित्रपट आहे. प्रीतम यांनी ही गाणी कम्पोज केली आहेत. अलीकडे या चित्रपटाच्या एका पोस्टरमुळे कॅटरिना नाराज असल्याची बातमी आली होती. या पोस्टरवर कॅटरिना तिच्या एक्स बॉयफ्रेन्डला किस करत असताना दाखवले आहे. कॅटरिनाला म्हणे, हे पोस्टर जराही आवडलेले नाही. हे पोस्टर रिलीज केले जाऊ नये, असे तिचे मत आहे आणि तिने अनुरागला तसे बोलूनही दाखवले आहे. केवळ एवढेच नाही तर चित्रपटाचे यापुढचे सगळे पोस्टर्स मला दाखवूनच रिलीज व्हावेत, असे कॅटचे म्हणणे आहे. अनुरागला कॅटचा हा तोरा आवडलेला नाहीच. त्यामुळे दोघांमध्ये सध्या तणफण सुरु असल्याचे कळतेय. 

Web Title: Finally Ranbir Kapoor disclosed; 'Jagga spy' will come to date!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.