अखेर ऐश-रणबीरच्या ‘हॉट’ दृश्यांवर सेन्सॉरची कात्री!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 12:39 IST2016-10-13T06:10:54+5:302016-10-17T12:39:33+5:30
आधीच वादात सापडलेला करण जोहर याचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा आगामी चित्रपट चर्चेत होता तो ऐश्वर्या राय बच्चन ...
.jpg)
अखेर ऐश-रणबीरच्या ‘हॉट’ दृश्यांवर सेन्सॉरची कात्री!!
आ ीच वादात सापडलेला करण जोहर याचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा आगामी चित्रपट चर्चेत होता तो ऐश्वर्या राय बच्चन व रणबीर कपूर यांच्या हॉट दृश्यांमुळे. ‘ऐ दिल है मुश्किल’चा ट्रेलर लॉन्च झाल्यापासून तर या हॉट दृश्यांची चर्चा अधिकच रंगली होती. मध्यंतरी ऐश्वर्याच्या या हॉट दृश्यांमुळे बच्चन कुटुंबीय नाराज असल्याचीही खबर होती. पण बच्चन कुटुंबीयांची ही नाराजी डावलून ही दृश्ये चित्रपटात कायम राहिलीत. पण कदाचित सेन्सॉर बोर्डाला ती रूचली नसावीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डाने ऐश व रणबीर यांच्यातील काही हॉट दृश्ये गाळण्याचे आदेश दिले. सेन्सॉर बोर्डासमक्ष झालेल्या स्क्रीनिंगवेळी खुद्द करण जोहर हजर होता. ही सगळी दृश्ये कथेची गरज आहे, हे त्याने सेन्सॉर बोर्डाला पटवून देण्याचा बराच प्रयत्न केला. पण बोर्डाने करणचे सगळे युक्तिवाद धुडकावून लावत चित्रपटातील ऐश-रणबीर यांच्यातील तीन हॉट दृश्ये कापण्याचे निर्देश दिले. आता बोर्डाच्या या आदेशानंतर करणला ही तिन्ही दृश्ये चित्रपटातून गाळावी लागणार आहेत. या बातमीने ऐश व रणबीरची हॉट केमिस्ट्री पाहण्यास उत्सूक असलेल्या प्रेक्षकांची काहीशी निराशा होणे साहजिक आहे. आता ही निराशा बॉक्सआॅफिसवर कुठल्या स्वरूपात दिसते, ते बघूच!!