म्हणून त्याला किंग खान म्हणतात! 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीला ड्रेसमुळे चालताच येईना, शाहरुखची 'ती' कृती प्रेक्षकांना भावली
By कोमल खांबे | Updated: October 13, 2025 18:19 IST2025-10-13T18:19:11+5:302025-10-13T18:19:43+5:30
'लापता लेडीज' फेम अभिनेत्री नितांशी गोयल हिला सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) हा पुरस्कार देण्यात आला. पण, पुरस्कारासाठी स्टेजवर येताना नितांशीवर तिच्या ड्रेसमुळे डोक्यावर हात मारण्याची वेळ आली होती.

म्हणून त्याला किंग खान म्हणतात! 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीला ड्रेसमुळे चालताच येईना, शाहरुखची 'ती' कृती प्रेक्षकांना भावली
मनोरंजनविश्वातील ७०वा फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा नुकताच अहमदाबाद येथे पार पडला. या सोहळ्यातील काही खास क्षण समोर आले आहेत. बॉलिवूडमधील सिनेमांमध्ये उत्तम काम केलेल्या कलाकारांना फिल्मफेअर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 'लापता लेडीज' फेम अभिनेत्री नितांशी गोयल हिला सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) हा पुरस्कार देण्यात आला. पण, पुरस्कारासाठी स्टेजवर येताना नितांशीवर तिच्या ड्रेसमुळे डोक्यावर हात मारण्याची वेळ आली होती.
नितांशी या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी खास पिवळ्या रंगाचा गाऊन घालून आली होती. मात्र या ड्रेसमध्ये तिला चालताही येत नव्हतं. स्टेजवर पायऱ्या चढताना नितांशीचा तोल जाऊन ती पडली असती. पण इतक्यात शाहरुख खानने तिला सावरलं. नितांशीचा हात पकडून तिला स्टेजपर्यंत किंग खान घेऊन गेला. एवढंच नव्हे तर किंग खानने नंतर तिचा ड्रेसही हातात पकडल्याचं व्हिडीओत दिसत आहे. शाहरुखच्या कृतीचं सर्वत्र कौतुकही होत आहे. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
दरम्यान, 'लापता लेडीज' या चित्रपटामध्ये साकारलेल्या 'मंजू माई' या पात्रासाठी मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांनाही 'सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री' हा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी जेव्हा छाया कदम स्टेजवर गेल्या, तेव्हा तिथे बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान उपस्थित होता. भावूक झालेल्या छाया यांना शाहरुखनं धीर देत मीठी मारून त्यांचं कौतुक केलं. ऐवढंच नाही शाहरुखनं स्वत: छाया यांना मंचावरून खाली नेऊन सोडलं.