तमन्ना भाटियाच्या ‘या’ चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसतील एका खास ‘भूमिकेत’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 14:31 IST2017-10-02T08:59:13+5:302017-10-02T14:31:32+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच एका बॉलिवूड चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.  आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. अर्थात ...

In this film, Tamanna Bhatia will see Prime Minister Narendra Modi in a special "role"! | तमन्ना भाटियाच्या ‘या’ चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसतील एका खास ‘भूमिकेत’!

तमन्ना भाटियाच्या ‘या’ चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसतील एका खास ‘भूमिकेत’!

तप्रधान नरेंद्र मोदी लवकरच एका बॉलिवूड चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.  आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. अर्थात मोदी यात अभिनय नाही तर वेगळेच काही करणार आहेत. होय, मोदी या चित्रपटाला वॉईस ओवर देणार आहेत.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या सरकारच्या जनजागृती मोहिमेवर आधारित या चित्रपटाचे नाव आहे ‘एबीसी’. पंतप्रधान मोदी याच चित्रपटाला आपला आवाज देणार आहेत. पंतप्रधानांशिवाय या चित्रपटात अनेक दिग्गज अतिथी भूमिकेत दिसणार आहेत.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या चित्रपटाला संगीत देणार आहेत. मेगास्टार अमिताभ बच्चन, साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी, अभिनेता सुनील शेट्टी, श्री श्री रविशंकर, किरण बेदी असे अनेक जण यात अतिथी भूमिकेत असतील. अ‍ॅण्टी करप्शन, क्राईम कंट्रोल कमिटी आणि ग्रॅव्हिटी ग्रूप मिळून हा चित्रपट बनवत आहेत. दोन तासांचा हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारीत होऊ घातलेल्या जर्मन आणि फ्रेंच फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला जाईल. रामकुमार शेंडगे दिग्दर्शित हा चित्रपट एकूण १४ भाषांमध्ये डब केला जाणार आहे. देशातील सर्व शाळांमध्ये हा चित्रपट दाखवणे अनिवार्य केला जाण्याचीही शक्यता आहे.
या चित्रपटांचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे ‘आॅस्कर’साठी नॉमिनेट झालेल्या ‘लॉयन’ या चित्रपटातील बालकलाकार सनी पवार या चित्रपटात दिसत आहे. ‘बाहुबली’फेम तमन्ना भाटिया ही सुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. मीडिया पर्सन असण्याच्या पॉवरचा गैरफायदा न घेता याचा सकारात्मक वापर केला जायला हवा. बेटी बचाओ, बेटी पढाओ प्रोजेक्टसोबत जुळून मी प्रचंड आनंदी आहे, असे तमन्ना म्हणाली.

ALSO READ : ​नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर येणार चित्रपट... हा अभिनेता साकारणार नरेंद्र मोदींची भूमिका

लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित गुजराती चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘हूँ नरेंद्र मोदी बनवा मांग छू’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात मोदींच्या लहानपणीचा संघर्ष दाखवला आहे. चित्रपटाचे शूटींग जवळपास पूर्ण झाले आहे. दिग्दर्शक अनिल नरयानी दिग्दर्शित हा चित्रपट येत्या नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: In this film, Tamanna Bhatia will see Prime Minister Narendra Modi in a special "role"!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.