‘फिलहाल’ हिट होताच नुपूर सॅननने केले हॉट फोटोशूट, बोल्ड अवतार पाहून व्हाल घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 13:46 IST2019-11-24T13:45:32+5:302019-11-24T13:46:24+5:30

अभिनेत्री क्रिती सॅननची बहीण नुपूर सॅनन सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे.

filhall song actress nupur sanon share bold and sexy pictures on instagram | ‘फिलहाल’ हिट होताच नुपूर सॅननने केले हॉट फोटोशूट, बोल्ड अवतार पाहून व्हाल घायाळ

‘फिलहाल’ हिट होताच नुपूर सॅननने केले हॉट फोटोशूट, बोल्ड अवतार पाहून व्हाल घायाळ

ठळक मुद्देक्रितीसोबत नूपुर हेअर ऑईलच्या जाहीरातीत झळकली होती.

अभिनेत्री क्रिती सॅननची बहीण नुपूर सॅनन सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. नुपूर लवकरच सुशांत सिंग राजपूतसोबत बॉलिवूड डेब्यू करणार असल्याच्या चर्चा आहे. नुपूरचे ‘फिलहाल’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले. या म्युझिक व्हिडिओमध्ये नुपूर अक्षय कुमारसोबत दिसले. गाण्यातील अक्षय व नुपूरची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. पण सध्या नुपूर या गाण्यामुळे नाही तर तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहेत.


ग्रीन कलरच्या ड्रेसमधील नुपूरचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तिच्या बोल्ड अदा तुम्हालाही वेड लावतील.


नुपूरने स्वत: हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रियंकासोबतचा एक फोटोही तिने शेअर केला आहे. यात ती बहीण क्रितीसोबत दिसतेय.


 नूपुरने अद्यापपर्यंत चित्रपटात येण्याबाबतची रितसर घोषणा केलेली नाही. परंतु अशातही तिच्या चाहत्यांची संख्या हळूहळू वाढत आहे.  नुपूर सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह असते.

अद्याप तिने तिच्या बॉलिवूड एन्ट्रीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. परंतु तिचे सोशल मिडियावर एक मिलियनहून अधिक चाहते आहेत. इंन्स्टाग्रामवरील लाखो फॉलोवर्स आणि बहिण क्रितीसोबत असलेल्या अनेक फोटोंमुळेही नूपुरचे अनेक फॉलोवर्स आहेत. ती तिच्या स्टाईल, फॅशनमुळेही प्रसिद्ध आहे. क्रितीसोबत नूपुरही हेअर ऑईलच्या जाहीरातीत झळकली होती.

Web Title: filhall song actress nupur sanon share bold and sexy pictures on instagram