'या' दिवशी ओटीटीवर येणार हृतिक रोशन-दीपिका पदुकोणचा 'फायटर'! इतक्या कोटींमध्ये Netflix विकले गेलेत चित्रपटाचे हक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 12:10 PM2024-03-01T12:10:55+5:302024-03-01T12:15:24+5:30

'फायटर'च्या ओटीटी प्रदर्शनाबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे.

Fighter OTT Release Netflix: When To Watch Hrithik Roshan-Deepika Padukone’s Film | 'या' दिवशी ओटीटीवर येणार हृतिक रोशन-दीपिका पदुकोणचा 'फायटर'! इतक्या कोटींमध्ये Netflix विकले गेलेत चित्रपटाचे हक्क

'या' दिवशी ओटीटीवर येणार हृतिक रोशन-दीपिका पदुकोणचा 'फायटर'! इतक्या कोटींमध्ये Netflix विकले गेलेत चित्रपटाचे हक्क

अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा 'फायटर' चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता 'फायटर'लवकरच ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे. 'फायटर'च्या ओटीटी प्रदर्शनाबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे.

 मीडिया रिपोर्ट्सनुसार, Netflix ने 'फायटर' चे OTT अधिकार  150 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. तगडी स्टारकास्ट असलेला 'फायटर' आता ओटीटीवर हा बघायला चाहते खूपच उत्सुक आहेत. 2019 मध्ये पुलवामा हल्ला आणि बालाकोट एअर स्ट्राइकवर आधारित हृतिक आणि दीपिकाचा हा चित्रपट होळीच्या मुहूर्तावर OTT वर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. नेटफ्लिक्स किंवा निर्मात्यांनी अद्याप याची घोषणा केलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्सवर २१ मार्च २०२४ पासून पाहता येणार आहे. 

'फायटर'च्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले, तर हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्याशिवाय या चित्रपटात अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोव्हर, आकर्ष अलग आणि संजीदा शेख यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'फायटर'चे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.  तर सिनेमाची निर्मिती ही वायकॉम 18 स्टुडिओच्या बॅनरखाली केली गेली आहे.  25 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त 'फायटर' थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित झाल्यापासून सिनेमा जोरदार कमाई करत आहे. 

Web Title: Fighter OTT Release Netflix: When To Watch Hrithik Roshan-Deepika Padukone’s Film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.