लगानची पंधरा वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 17:22 IST2016-06-15T11:52:13+5:302016-06-15T17:22:13+5:30

बॉलीवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट लगानला बुधवारी १५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने फॅन्सनी ‘लगानची १५ वर्षे’ नावाने ट्विट केले.  आशुतोष गोवारीकर ...

Fifteen years of rent | लगानची पंधरा वर्षे

लगानची पंधरा वर्षे

लीवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट लगानला बुधवारी १५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने फॅन्सनी ‘लगानची १५ वर्षे’ नावाने ट्विट केले. 
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित लगान १५ जून २००१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आमीरने भुवनची भूमिका केली होती. स्थानिक ब्रिटीशांविरुद्ध हा युवक आपल्या संघासह  क्रिकेट खेळतो. जर खेडेगावचे लोक विजयी झाले तर तीन वर्षे त्यांना कर भरावा लागणार नाही आणि पराभूत झाले तर दुप्पट कर भरावा लागेल या अटीवर हा सामना होता. अर्थात कोण जिंकतो हे सांगावयास नको.
या चित्रपटात ग्रेसी सिंग, कुलभूषण खरबंदा, सुहासिनी मुळे, रघुवीर यादव, यशपाल शर्मा, राजेश विवेक, राज झुत्शी, प्रदीप रावत, अखिलेंद्र मिश्रा, दयाशंकर पांडे, श्रीवल्लभ व्यास, अमीन हाजी, आदित्य लाखिया हे खेडुतांच्या संघाकडे होते. ब्रिटीशांच्या संघात पॉल ब्लॅकथॉर्नने कर्णधार अँड्र्यू रसेलची भूमिका केली होती. रशेल शेली ही त्याची बहीण एलिझाबेथ असते.
२००२ च्या आॅस्करसाठी भारताकडून लगानचे नामांकन झाले होते. मदर इंडिया आणि सलाम बॉम्बेनंतरचा लगान हा तिसरा चित्रपट जो अंतिम पाचमध्ये आला होता.

Web Title: Fifteen years of rent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.