फातिमा सना शेखच्या चाहत्यांना काळी काळ सोसावी लागणार कळ! कारण आहे आदित्य चोप्रा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 12:20 IST2017-10-20T06:50:54+5:302017-10-20T12:20:54+5:30
फातिमा सना शेख बॉलिवूडमध्ये अगदीच नवखी आहे. तिच्या नावावर सध्या केवळ एक चित्रपट आहे. पण म्हणून फातिमाच्या चाहत्यांची संख्या ...

फातिमा सना शेखच्या चाहत्यांना काळी काळ सोसावी लागणार कळ! कारण आहे आदित्य चोप्रा!!
फ तिमा सना शेख बॉलिवूडमध्ये अगदीच नवखी आहे. तिच्या नावावर सध्या केवळ एक चित्रपट आहे. पण म्हणून फातिमाच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींइतकेच तिचेही चाहते आहेत. ‘दंगल’मध्ये आपल्या अभिनयाने सगळ्यांना वेड लावणारी फातिमा लवकरच आमिर खानच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून फातिमा या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. अर्थात तरिही चाहत्यासोबत सोशल मीडियावरून ती संपर्कात होती. पण आता ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चा निर्माता आदित्य चोप्राने म्हणे फातिमा काही कडक सूचना दिल्या आहेत आणि फातिमाला या सूचनांचे पालन करायचे आहे. आदित्य चोप्राच्या या सूचना कदाचित फातिमाच्या चाहत्यांना निराश करू शकतात.
बॉलिवूडमधील चर्चा खरी मानाल, तर आदित्यने म्हणे फातिमाला सोशल मीडियापासून काही काळ अलिप्त राहण्याचा सल्ला दिला. सोशल मीडियावर आपल्या पोस्ट लिमिटेड कर, असे आदित्यने तिला बजावले आहे. केवळ इतकेच नाही तर सोशल मीडियासोबत पब्लिक अपिरन्स कमी करण्याचे शिवाय नवे प्रोजेक्ट साईन न करण्याचेही आदित्यने फातिमाला बजावले आहे. फातिमाला ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या शूटींगदरम्यान कुठलाही नवा प्रोजेक्ट साईन करण्यास मनाई केली आहे. तिला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यास आणि कुठलाही इव्हेंट अटेंड करण्यासही मनाई करण्यात आली आहे. फातिमाच्या एका जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, फातिमाने आदित्यच्या या निर्देशानुसार वागण्याचे ठरवले आहे. कारण तिच्यासाठी ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ अतिशय महत्त्वाचा सिनेमा आहे. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये फातिमा अतिशय महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. त्यामुळे तिच्यासाठी हा चित्रपट म्हणजे एक सुवर्णसंधी आहे. स्वत:चे टॅलेन्ट दाखवण्याची एक मोठी संधी तिला या निमित्ताने मिळाली आहे आणि फातिमाला या संधीचे सोने करायचे आहे. आता फातिमा या संधीचे किती सोने करते ते बघूच. तोपर्यंत फातिमाच्या चाहत्यांना कळ सोसणे आलेच.
‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये फातिमाशिवाय आमिर खान, कॅटरिना कैफ आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत.
ALSO READ: Trolled: फातिमा सना शेखच्या ‘शेमलेस सेल्फी’ने आणला लोकांना राग! वाचा सविस्तर!!