कपिल शर्माने स्वत: केली होती वडिलांच्या मृत्यूसाठी देवाकडे प्रार्थना, पण का? वाचा सविस्तर…

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 15:33 IST2025-06-15T15:32:12+5:302025-06-15T15:33:11+5:30

कपिल शर्माने वडिलांच्या मृत्यूसाठी केली होती देवाकडे प्रार्थना, जाणून घ्या मागचं कारण

Fathers Day 2025 Kapil Sharma Once Revealed That He Used To Pray For His Father Death Know The Reason | कपिल शर्माने स्वत: केली होती वडिलांच्या मृत्यूसाठी देवाकडे प्रार्थना, पण का? वाचा सविस्तर…

कपिल शर्माने स्वत: केली होती वडिलांच्या मृत्यूसाठी देवाकडे प्रार्थना, पण का? वाचा सविस्तर…

कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) म्हणजे सर्वांना हसवणारा कपिलच डोळ्यासमोर येतो. कॉमेडी नाईट्स विद कपिल शर्मा या शोने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवले.  सध्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मुळे चर्चेत असतो. सर्वांना खळखळून हसवणारा कपिल खऱ्या आयुष्यात मात्र किती दु:खांना सामोरा गेला आहे, याची कल्पनाही करता येणार नाही. एक काळ असा होता की कपिलनं खुद्द वडिलांच्या मृत्यूसाठी देवाकडे प्रार्थना केली होती. 

२०१४ मध्ये एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये कपिलने सांगितलं होतं की, त्याचे वडील कर्करोगाने त्रस्त होते आणि एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेव्हा वडिलांना होणाऱ्या प्रचंड वेदना पाहून कपिल असहाय झाला होता. त्यानं सांगितलं होतं की, "बाबा वेदनेने कण्हायचे. त्यांना त्या अवस्थेत पाहून मला प्रचंड भीती वाटायची. मी देवाकडे प्रार्थना करायचो की त्यांना यातून मुक्त कर आणि आपल्याकडे घेऊन जा". तेव्हा कपिल केवळ २० वर्षांचा होता.

कपिलने हेही सांगितले की, त्या वेळी त्याला हे समजत नव्हतं की वडिलांशिवायचं जीवन किती कठीण असू शकतं. त्याचं बालपण गरिबीत गेलं आणि वडिलांच्या मृत्यूनंतर घराची जबाबदारी त्याच्यावर आली. मात्र, या साऱ्या संघर्षांवर मात करत कपिल आज कोट्यवधींचा मालक आहे.


कपिल शर्माची एकूण संपत्ती सुमारे ३०० कोटी रुपये आहे. त्याचे मुंबईत आणि पंजाबमध्ये आलिशान घर आहे. तो लवकरच एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. त्याच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा तिसरा सीझन नेटफ्लिक्सवर २१ जूनपासून दर शनिवारी रात्री ८ वाजता नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे.
 

Web Title: Fathers Day 2025 Kapil Sharma Once Revealed That He Used To Pray For His Father Death Know The Reason