बाप कैदी अन् लेक पोलीस; सैफ अन् साराची जोडी मोठ्या पडद्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 22:53 IST2023-06-22T22:48:46+5:302023-06-22T22:53:07+5:30

सोशल मीडियावर सैफ अली खान आणि सारा अली खानचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

Father Prisoner and Lake Police; Saif Ali khan and Sara Ali Khan pair on the big screen? | बाप कैदी अन् लेक पोलीस; सैफ अन् साराची जोडी मोठ्या पडद्यावर?

बाप कैदी अन् लेक पोलीस; सैफ अन् साराची जोडी मोठ्या पडद्यावर?

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि त्याची मुलगी सारा अली खान हे एकत्र कमी वेळाच पाहायला मिळतात. मात्र, आता दोघांचा एकत्र फोटो समोर आला आहे. विशेष म्हणजे एका चित्रपटासाठीचा ते दोघे एकत्र आल्याचा हा फोटो असून सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे. रिअल लाईफ पिता-पुत्र किंवा वडिल-कन्या चित्रपटात एकत्रितपणे काम करण्याचे प्रसंग कमीच आहेत. मात्र, या जोड्या एकत्र आल्यानंतर सिने चाहत्यांनाही भावतात. आता, सैफ अली खान आणि सारा अली खान एकत्र पाहायला मिळणार आहेत. 

सोशल मीडियावर सैफ अली खान आणि सारा अली खानचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये सैफ अली खान कैद्याच्या वेशात दिसत असून सारा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. दोघांचा हा रोल असलेला नेमका काय प्रोजेक्ट किंवा चित्रपट आहे, याबाबत अद्याप ठोस माहिती नाही. मात्र, बाप-लेकीचा फोटो पाहून चाहते उत्सुक झाले आहेत. 

सिने रसिकांना हा फोटो पाहून उत्कंठा लागून राहिली आहे. सारा अली आणि सैफ यांच्या अभिनयाचा नेमका एपिसोड काय आहे. एका सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई फिल्मी सिटीमध्ये सारा आणि सैफ यांच्या आगामी प्रोजेक्टचे शुटींग सुरू आहे. येथे साराचा भाऊ इब्राहिम अली खान हाही दिसून आला होता. विशेष म्हणजे ४ दिवसांपूर्वीच साराने वडिल सैफ आणि भाऊ इब्राहिम सोबतचा एक कॅज्युअल फोटोही शेअर केला होता.

 

Web Title: Father Prisoner and Lake Police; Saif Ali khan and Sara Ali Khan pair on the big screen?