Fat to Fit : ​बॉलिवूडचे ‘फिटनेस फ्रिक’ सेलिब्रिटी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 14:29 IST2017-10-27T08:59:07+5:302017-10-27T14:29:07+5:30

- रवींद्र मोरे सेलिब्रिटी आणि फिटनेस हे जणू समीकरण झाले आहे. फिट असल्याशिवाय त्यांचे करिअर नाही, असे म्हणणेही चुकीचे ...

Fat to Fit: Bollywood's 'Fitness Freak' celebrity ... | Fat to Fit : ​बॉलिवूडचे ‘फिटनेस फ्रिक’ सेलिब्रिटी...

Fat to Fit : ​बॉलिवूडचे ‘फिटनेस फ्रिक’ सेलिब्रिटी...

ong>- रवींद्र मोरे
सेलिब्रिटी आणि फिटनेस हे जणू समीकरण झाले आहे. फिट असल्याशिवाय त्यांचे करिअर नाही, असे म्हणणेही चुकीचे ठरणार नाही. बॉलिवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत जे अगोदर खूपच लठ्ठ होते मात्र त्यांचा करिअरचा विचार केला असता त्यांना हा लठ्ठपणा कमी करून सडपातळ बांध्यात यावे लागले. आता हे सर्व स्टार्स कमालीचे ‘फिटनेस फ्रिक’ असल्याचे दिसून आले आहे. आज आपण अशाच काही बॉलिवूड स्टार्सची जर्नी जाणून घेऊया...!

Related image

* परिणीती चोप्रा 
परिणीती ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या सिनेमात लठ्ठ दिसली होती. मात्र या सिनेमानंतर आपली फॅन फॉलोइंग वाढवण्यासाठी परिणीतीने वजन कमी करण्याचे ठरवले. जेव्हा तिचा ‘इश्कजादे’ हा सिनेमा रिलीज झाला, तेव्हा तिच्यात बराच फरक दिसून आला होता. आता तर ती अगदी फिट झाली आहे.



* सोनाक्षी सिन्हा
सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी सोनाक्षीचे वजन तब्बल ९० किलो होते. करिअरच्या दृष्टीनेच सोनाक्षीने आपले वाढलेले वजन बरेच कमी केले. सलमान खानच्या सांगण्यावरुन तिने स्वत:चे वजन कमी केले होते. ‘दबंग’ सिनेमाच्या शुटिंगपूर्वी सोनाक्षीने ३० किलो वजन कमी केले होते. ‘तेवर’ या सिनेमासाठी सोनाक्षीने जिममध्ये बरीच मेहनत घेतली होती. आता सोनाक्षी अगदी फिट दिसते आणि आपल्या फिटनेसवर ती काम करते.



* जरीन खान 
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी जरीन खानचे वजन १०० किलो होते. त्यामुळे भविष्यात कधी अ‍ॅक्ट्रेस होईल, असा स्वप्नातही तिने कधी विचार केला नव्हता. २०१० मध्ये सलमान खानच्या अपोझिट वीर सिनेमात जरीनला ड्रीम रोल मिळाला. यासाठी जरीनने तिचे ३० किलो वजन कमी केले. मात्र इथवरच तिला थांबून चालणार नव्हते. जरीनला वाढत्या वजनामुळे टीकेला सामोरे जावे लागले होते. नंतर अगदी फिट होण्यासाठी तिने योगा, कार्डिओ बुटकँप आणि स्पेशल वेट लॉस ट्रेनिंग घेतले. याचा परिणाम म्हणजे जरीन आता अगदी फिट झाली आहे. 



* सोनम कपूर 
सोनम कपूरला स्टाईल आयकॉन म्हणून ओळखले जाते. 'सावरिया' या पहिल्या सिनेमाच्या वेळी सोनम कपूरचे वजन ८६ किलो होते. मात्र नंतर तिने ३० किलो वजन कमी करुन स्वत:ला सेक्सी बनवले. सोनम याकाळात बॉलिवूडची सर्वाधिक फिट अ‍ॅक्ट्रेस आहे. शिवाय तिच्या ड्रेस सेन्सचेही विशेष कौतुक होत असते.  

Image result for alia fat to fit images

* आलिया भट
महेश भट आणि सोनी राजदान यांची लाडकी कन्या आलिया भट हिने स्टुडंट आॅफ द इयर या सिनेमाद्वारे सिल्व्हर स्क्रिनवर एन्ट्री घेतली आणि पहिल्याच सिनेमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. बबली गर्ल म्हणून ती प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. ‘स्टुडंट आॅफ द इयर’ नंतर आलियाने एकामागून एक हिट सिनेमे दिले. पडद्यावर अतिशय ग्लॅमरस दिसणारी आलिया एकेकाळी गोलमटोल होती, यावर तुमचा विश्वास बसेल का... मात्र हे खरे आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी आलिया बरीच लठ्ठ होती. तिचे वजन ६७ किलो होते. मात्र, सिनेमाची आॅफर आल्यानंतर तिने आपल्या फिगरवर लक्ष केंद्रित केले आणि तीन महिन्यांत १६ किलो वजन कमी करुन पडद्यावर अवतरली.  

Image result for kareena fat to fit images

* करिना कपूर  
बी टाऊनमध्ये झिरो फिगरचा ट्रेंड आणणारी अभिनेत्री करीना कपूरसुद्धा खूप लठ्ठ होती. मात्र ‘टशन’ सिनेमाच्या वेळी करिनाने आपल्या फिगरवर विशेष लक्ष दिले आणि झिरो साईज फिगरमुळे तिने एका रात्रीत प्रसिद्धी मिळवली होती.


 

Web Title: Fat to Fit: Bollywood's 'Fitness Freak' celebrity ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.