दीपिका, कंगणाकडून घेतली क्रितीने फॅशनची प्रेरणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 16:07 IST2016-09-23T14:48:26+5:302016-09-24T16:07:01+5:30
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन ही लवकरच ‘राब्ता’ चित्रपटात दिसणार आहे. कंगणा राणौत, दीपिका पादुकोण व सोनम कपूर यांच्यासारख्या अभिनेत्रीकडून ...

दीपिका, कंगणाकडून घेतली क्रितीने फॅशनची प्रेरणा
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन ही लवकरच ‘राब्ता’ चित्रपटात दिसणार आहे. कंगणा राणौत, दीपिका पादुकोण व सोनम कपूर यांच्यासारख्या अभिनेत्रीकडून मी फॅशनची प्रेरणा घेतल्याचे क्रिती म्हणते. एका फॅशन शो प्रसंगी क्रितीने सांगितले की, अनेक बॉलिवूड अभिनेत्रीनी मला प्रेरणा दिलेली आहे. दीपिकाचा मला कपडे परिधान करण्याचा अंदाज आवडतो. तर कंगणाचा लुक्स बरोबरच प्रयोग व फॅशन करण्याची पद्धत आवडते. तसेच सोनम कपूरचीही फॅशनची वेगळी शैली आहे. अभिनेत्रामध्येही अनेक जण फॅशनेबल आहेत. विशेष करुन मला शाहरुख खानची स्टाईल आवडत असल्याचीही क्रिती म्हणाली. दिनेश विजेन यांनी दिग्दर्शित केलेला राब्ता या चित्रपटात क्रिती सॅनन व सुशांत सिंग राजपूत प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी १० फेबु्रवारीलर रिलीज होत आहे.