फरहानने उकरून काढला वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 21:44 IST2016-10-29T21:44:50+5:302016-10-29T21:44:50+5:30
पाकिस्तानी कलाकार असलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांनी पाच कोटी रुपये सेनेला दान स्वरूपात देण्याचा हट्ट महाराष्ट्र नवनिर्माण सनेने धरला आहे. मात्र ...

फरहानने उकरून काढला वाद
विविध न्यूज चॅलनला दिलेल्या बातम्यानुसार फरहान अख्तरने आपला विरोध दर्शविला आहे. फरहानची भागिदारी असलेल्या एक्सेल एन्टरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार होणारा शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रईस’ या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिची भूमिका आहे. फरहानने आयबीन टीव्ही 18 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनसेच्या भूमिकेचा विरोध केला आहे. तो म्हणाला, जेव्हा सेनाच हा फंड स्वीकारयाला तयार नाही तर अशा वेळी राशी दान करण्याचा प्रश्नच येत नाही. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना फरहानने याच वाक्याचा पुनर्उच्चार केला. तो म्हणाला, सरकार देखील तुम्हाला काय करावे किंवा काय करू नये यावर बोलत नसेल तर तुम्ही कुणाच्या मताने वागत आहात.
दुसरीकडे, मनसेच्या सिमे विंगचे अध्यक्ष अमेय खोपकर याने मिड-डेशी बोलताना म्हणाले, प्रदर्शनाची तारिख जवळ येऊ द्या तेव्हा पाहू. त्यावेळी हे लोक कुठे गेले होते, जेव्हा पाच कोटी देण्याचा निर्णय झाला होता. आता सर्वांना जाग आली आहे का?
‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रदर्शनाचा तिढा सोडविण्याठी गेलेल्या चित्रपट निर्मात्यांच्या शिष्टमंडळाने पाकिस्तानी कलावंताना बॉलिवूडमध्ये काम करू देणार नाही असा शब्द दिलाय. दुसरीकडे मनसेने पाकिस्तानी कलाकार असलेल्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सैन्यनिधीत पाच कोटी रुपये द्यावे अशी मागणी केली. मात्र संरक्षण मंत्रालयाकडून याची कोणतिच गरज नसल्याचे सांगितले आहे. आता हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असल्याने दिवाळीत याविषयांच्या प्रतिक्रियांची चांगलीच आतषबाजी होणार असल्याचे दिसते.