​फरहान अख्तरचा चढला पारा; म्हणे, असे बोलण्याची तुमची हिंमतच कशी झाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 11:30 IST2017-10-23T05:55:11+5:302017-10-23T11:30:29+5:30

अभिनेता  फरहान अख्तर सध्या जाम संतापला आहे. या संतापाचे कारण आहे, ‘मर्सल’ हा चित्रपट. तामिळ स्टार विजय याचा ‘मर्सल’ ...

Farhan Akhtar's rise in mercury; You said, how was your courage to say that? | ​फरहान अख्तरचा चढला पारा; म्हणे, असे बोलण्याची तुमची हिंमतच कशी झाली?

​फरहान अख्तरचा चढला पारा; म्हणे, असे बोलण्याची तुमची हिंमतच कशी झाली?

िनेता  फरहान अख्तर सध्या जाम संतापला आहे. या संतापाचे कारण आहे, ‘मर्सल’ हा चित्रपट. तामिळ स्टार विजय याचा ‘मर्सल’ हा चित्रपट सध्या वादात सापडला आहे. राजकीय गोटात या चित्रपटातील एका दृश्यावरून सध्या वादळ माजले आहे. सध्या या चित्रपटातील जीएसटीशी संबंधित एक सीन सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. या सीनमध्ये चित्रपटाचा हिरो विजयच्या तोंडी एक डायलॉग आहे. ‘सिंगापूरमध्ये ७ टक्के जीएसटी आहे. तरिही तेथे मोफत औषधे मिळतात. याऊलट भारतात औषधांवर १२ टक्के जीएसटी आहे आणि अल्कोहोलवर कुठलाच जीएसटी नाही,’ असे विजय यात म्हणतो. या सीनमध्ये विजय गोरखपूरच्या ट्रॅजेडीवरही बोलताना दिसतो आहे.


हा सीन चित्रपटातून गाळण्याची मागणी भाजपाने केली होती. सध्या यावरून राजकीय वातावरण तापले आहे. विजयच्या या चित्रपटावर भाजपने आक्षेप घेतला आहे. चित्रपटातील काही दृश्यांमध्ये जीएसटी करप्रणाली, नोटाबंदी आणि डिजिटल इंडियाविषयी गैरसमज निर्माण करणारी माहिती देण्यात आली असून ती आक्षेपार्ह पद्धतीने चित्रीत करण्यात आल्याचे भाजपाने म्हटले आहे. हीच मागणी पुढे रेटत, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव  यांनी ‘चित्रपटांमध्ये काम करणा-या मंडळींची बौद्धिक क्षमता फार कमी असते,’ असे वक्तव्य केले आहे. भाजपा प्रवक्त्याच्या नेमक्या याच वाक्यामुळे फरहान अख्तर संतापला आहे. केवळ संतापलाच नाही जीव्हीएल नरसिंह राव यांना त्याने टिष्ट्वटरवरून चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. ‘असे बोलण्याची तुमची हिंमतच कशी झाली?’असा संतप्त सवाल त्याने केला आहे. केवळ इतकेच नाही तर चित्रपटसृष्टीत काम करणाºया सर्वांनाच उद्देशून एक लिंकही शेअर केले आहे. या लिंकमध्ये जीव्हीएल नरसिंह राव यांचा व्हिडिओ आहे. विशेष म्हणजे, जीव्हीएल नरसिंह राव यांनी फरहानच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे. ‘फरहानजी, मत मांडणे म्हणजे हिंमत दाखवणे नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे. आता हे वाक्युद्ध पुढे किती रंगते ते बघूच.

ALSO READ: श्रद्धा कपूरवरुन झालेले भांडण विसरुन एकत्र आले फरहान अख्तर आणि आदित्य रॉय कपूर

‘मर्सल’बद्दल बोलायचे तर बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाने धमाका केला आहे. पहिल्या दिवशी ‘मर्सल’ने ४३.३ कोटी कमावले होते आणि ट्रेड रिपोर्ट्स खरे मानाल तर अधिकृतरित्या तीन दिवसात या चित्रपटाने शंभर कोटींचा गल्ला जमवला आहे. 
 

Web Title: Farhan Akhtar's rise in mercury; You said, how was your courage to say that?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.