फरहान अख्तरच्या 'लखनऊ सेंट्रल' चा ट्रेलर बघाच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 11:36 IST2017-07-27T05:46:07+5:302017-07-27T11:36:48+5:30

फरहान अख्तरचा आगामी चित्रपट 'लखनऊ सेंट्रल'चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट 15 सप्टेंबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Farhan Akhtar's Lucknow Central Trailer! | फरहान अख्तरच्या 'लखनऊ सेंट्रल' चा ट्रेलर बघाच !

फरहान अख्तरच्या 'लखनऊ सेंट्रल' चा ट्रेलर बघाच !

हान अख्तरचे फॅन्स ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते. तो क्षण आला आहे.फरहान अख्तरचा आगामी चित्रपट 'लखनऊ सेंट्रल' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटचा ट्रेलर अतिशय सुंदर आहे. एक चित्रपटात प्रेक्षकांना जो मसाल आवश्यक असतो तो सगळ्यात यात असल्याचा अंदाज ट्रेलरवरुन लावता येतो.


 
फरहान यात किशन मोहन गिरहोत्रा नावाची व्यक्तिरेखा साकारतो आहे. ज्याचे स्वप्न एक मोठा गायक व्हायचे असते. तो भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारीचा खूप मोठा फॅन असतो. मात्र किशनकडून एक चूक होते जी त्याला आयुष्यभरासाठी जेलमध्ये घेऊन जाते. मात्र त्याचे स्वप्न त्याला जेलमध्ये ही स्वस्त बसून देत नाही. यातच जेलच्या ऑफिसरकडे एक बँड बनवण्याचा प्रस्ताव येतो आणि किसनच्या आशा पुन्हा एकदा पाल्लवित होतात. किसन या बँडच्या माध्मातून आपले स्वप्न पूर्ण कसे करता येईल याच्या तयारीला लागतो. पण त्या हे स्वप्न करण्यासाठी त्याला काही लोकांच्या मदतीची आवश्यकता असते. आता त्याला यासाठी कोणी साथ देत की नाही हे चित्रपट आल्यावर कळले. याचित्रपटाचे दिग्दर्शन रंजीत तिवारी ने केले आहे. हा चित्रपट एका खऱ्या घटनेवर आधारित आहे.15 सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे.याआधी फरहान अख्तर 'रॉक ऑन2'मध्ये दिसला होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या आणि श्रद्धा कपूरच्या नात्याला घेऊन अनेक वेगवेगळ्या चर्चा रंगत आहे. रॉक ऑन2च्या सेटवर त्यांची भेट झाली. त्यानंतर ते लिव्हइनमध्ये होते. मात्र त्या दोघांनी आपले नातं कधीच स्वीकारले नाही.  


 

Web Title: Farhan Akhtar's Lucknow Central Trailer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.