फरहान अख्तर साकारतोय भोजपुरी नायकाची भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 17:23 IST2017-03-14T11:53:48+5:302017-03-14T17:23:48+5:30

अभिनेता फरहान अख्तर त्याच्या ‘लखनौ सेंट्रल’ या आगामी चित्रपटात भोजपुरी नायकाची भूमिका साकारतोय.  फरहान अख्तर आपल्या विविध भूमिकांमुळे चर्चेत ...

Farhan Akhtar plays the role of Bhojpuri hero! | फरहान अख्तर साकारतोय भोजपुरी नायकाची भूमिका!

फरहान अख्तर साकारतोय भोजपुरी नायकाची भूमिका!

िनेता फरहान अख्तर त्याच्या ‘लखनौ सेंट्रल’ या आगामी चित्रपटात भोजपुरी नायकाची भूमिका साकारतोय. 
फरहान अख्तर आपल्या विविध भूमिकांमुळे चर्चेत असतो. त्याला इतरांपेक्षा वेगळे, हटके करण्याची नेहमीच उत्सुकता असते. यातूनच त्याला ही भूमिका पसंत पडली. त्याने ही भूमिका करण्याचे ठरविले. भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारीचा फॅन म्हणूनही या चित्रपटात तो दिसेल अशी अपेक्षा आहे.
फरहान गेल्या अनेक दिवसांपासून एका हिटची आस लावून बसला आहे. त्याचे यापूर्वीचे वजीर, रॉक आॅन २ हे चित्रपट फारशी कमाई करू शकलेले नाहीत. फरहानने नेहमीच वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. भाग मिल्खा भाग हा त्याचा पहिला यशस्वी चित्रपट. धावक मिल्खा सिंग यांची भूमिका त्याने निभावली होती. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली. 
लखनौ सेंट्रलमध्ये त्याच्या सोबत अभिनेत्री डायना पेंटी ही देखील आहे. रणजित तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा त्यांचा पहिलाच चित्रपट. या चित्रपटाची निर्मिती निखील आडवाणी यांनी केली आहे. रणजित हा निखील आडवाणी यांचा सहायक दिग्दर्शक होता.
जेलमध्ये घडणाºया घटनांवर आधारित हा चित्रपट आहे. उत्तर प्रदेश, बिहार या हिंदी भाषक पट्ट्यात ज्या ठिकाणी भोजपुरी भाषा बोलली जाते, अशा ठिकाणी हा चित्रपट हिट होईल, अशी त्याला अपेक्षा आहे. हा चित्रपट १५ सप्टेंबर रोजी प्रकाशित होणार असल्याचे अगोदरच जाहीर करण्यात आले आहे.

Web Title: Farhan Akhtar plays the role of Bhojpuri hero!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.