फरहान अख्तरने खरेदी केली आलिशान गाडी, किंमत आहे तब्बल…
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 16:21 IST2025-10-24T16:19:36+5:302025-10-24T16:21:11+5:30
फरहान अख्तरच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एक मर्सिडीज मेबॅकची भर पडली आहे.

फरहान अख्तरने खरेदी केली आलिशान गाडी, किंमत आहे तब्बल…
Farhan Akhtar Buys Mercedes Maybach Gls600: बॉलिवूडमधील अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता, चित्रपट निर्माता आणि संगीतकार फरहान अख्तर सध्या त्याच्या खासगी आयुष्यातील एका मोठ्या खरेदीमुळे चर्चेत आहे. फरहान अख्तरच्या घरी नुकतंच एका नवीन आणि अत्यंत आलिशान गाडीचे आगमन झाले आहे. सोशल मीडियावर या गाडीचे व्हिडीओ व्हायरल होत असून फरहानच्या कार कलेक्शनमध्ये आता या महागड्या वाहनाची भर पडली आहे.
फरहान अख्तरने सर्वात महागड्या आणि आलिशान एसयूव्हींपैकी एक असलेली ब्रँड-न्यू मर्सिडीज-मेबॅक जीएलएस६०० (Mercedes-Maybach GLS600) खरेदी केली आहे. या आलिशान कारची किंमत अंदाजे ३.१५ कोटी आहे. फरहान अख्तरला लक्झरी कारची आवड आहे. मर्सिडीज-मेबॅक जीएलएस६०० शिवाय त्याच्याकडे Porsche Cayman, रेंज रोव्हर, मर्सिडीज वेंज आणि होंडा सीआरव्ही या गाड्या देखील आहेत. फरहान अख्तरला आलिशान जगणं आवडते. तो अनेकदा परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फरहान अख्तर १४८ कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. फरहान अख्तरने मुंबईतील वांद्रेमध्ये एक आलिशान बंगला बांधला आहे. फरहानने परदेशातही मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे. फरहान हा जावेद अख्तर यांचा मुलगा आहे.
मर्सिडीज-मेबॅक जीएलएस६०० ही गाडी खास का?
Mercedes-Maybach GLS600 ही एक अतिशय आलिशान आणि महागडी एसयूव्ही आहे, जी तिच्या उत्कृष्ट डिझाइन, आरामदायी वैशिष्ट्ये आणि शक्तिशाली इंजिनसाठी ओळखली जाते. या कारमध्ये अनेक चांगली फीचर्स आहेत. यामध्ये अॅडॉप्टिव्ह हाय बीम असिस्ट, अॅक्टिव्ह लेन कीपिंग आणि ब्लाइंड स्पॉट असिस्ट, ८ एअरबॅग्ज, ३६०-डिग्री पार्किंग कॅमेरे आणि ऑफ-रोड मोड यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. फरहान अख्तरची ही नवी आलिशान एसयूव्ही सध्या बी-टाऊनमध्ये चर्चाचा विषय ठरली आहे.