Farhan Akhtar Birthday: फरहान-शिबानी दांडेकरच्या रिलेशनशीपवर जावेद अख्तर यांची होती ही पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 13:42 IST2021-01-09T13:31:59+5:302021-01-09T13:42:30+5:30
शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर 2020मध्ये लग्न करणार अशी चर्चा रंगली होती

Farhan Akhtar Birthday: फरहान-शिबानी दांडेकरच्या रिलेशनशीपवर जावेद अख्तर यांची होती ही पहिली प्रतिक्रिया
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर नेहमी चर्चेत असतात. दोघेही अनेकवेळा एकमेकांसोबत फिरताना दिसतात. मात्र, मीडियासमोर दोघेही आपल्या नात्याबद्दल बोलण्यास तयार नसतात. पण इन्स्टाग्रामवर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची संधी सोडत नाहीत. दोघांचे व्हॅकेशनचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. फराहन अख्तरचा आज(9 जानेवारी) आपला वाढदिवस साजरा करतो आहे.
जावेद अख्तर यांनी आश्चर्य व्यक्त केले
शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर 2020मध्ये लग्न करणार अशी चर्चा रंगली होती. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये जेव्हा ही बातमी आली तेव्हा जावेद अख्तरने बॉम्बे टाईम्सशी बोलताना यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. जावेदा यांनी या बातमीवर आश्चर्य वाटले होते आणि ते म्हणाले, मी तुमच्याकडून याविषयी ऐकतो आहे. दोन दिवसांपूर्वी मी फरहानच्या वाढदिवशी होते. याबद्दल त्याने काही सांगितले नाही.
जावेद यांनी केलं शिबानीचे कौतुक
फरहान आणि शिबानी यांच्या लग्नाबद्दल विचारले असता ते म्हणाले, "तुम्ही हे कधीही म्हणू शकत नाही, मुले या प्रकरणात खूप सिलेक्टिव्ह असू शकतात." जेव्हा त्यांना शिबानीबद्दल विचारले गेले तेव्हा ते म्हणाले होते की, मी शिबानीला बर्याचदा भेटलो आहे, ती चांगली मुलगी आहे.
3 वर्षांपासून नात्यात होते
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत. हे दोघे त्यांच्या नात्याबद्दल बोलत नाहीत पण सोशल मीडियावरील त्यांच्यातले बॉन्डिंग जगजाहीर आहे.