फरहान अख्तर आणि अधुना अखेर झाले विभक्त !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:38 IST2017-04-25T10:06:38+5:302018-04-03T14:38:13+5:30
अखेर फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अधुना भबानी अखेर विभक्त झाले. वांद्रा फॅमिली कोर्टाने दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केला आहे. गत ...

फरहान अख्तर आणि अधुना अखेर झाले विभक्त !
अ ेर फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अधुना भबानी अखेर विभक्त झाले. वांद्रा फॅमिली कोर्टाने दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केला आहे. गत वर्षी 19 ऑक्टोबरला फरहान आणि अधुनाने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. फरहान आणि अधुना यांनी 16 वर्ष एकत्र संसार केला. फरहान आणि अधुना यांना दोन मुली आहेत. घटस्फोटानंतर या दोन्ही मुलांचा ताबा फरहानची पत्नी अधुनाला मिळाला आहे. फरहान ही या मुलांनी जाऊऩ भेटू शकतो तशी परवानगी त्याला कोर्टाने दिली आहे.
फराहन आणि अधुना यांच्या घटस्फोटामागचे कारण फरहान आणि श्रद्धा कपूर यांच्यामधील वाढती जवळीक मानली जाते आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 'रॉक ऑन2' चित्रपटातील चित्रिकरणादरम्यान फरहान आणि श्रद्धा एकमेंकाच्या जवळ आले होते. फरहान आणि श्रद्धा एकत्र राहत होते ज्याला श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांनी कडाडून विरोध केला होता. मात्र शक्ती कपूरने या गोष्टीचे खंडन केले होते. तर दुसरीकडे अधुनाही फरहान अख्तरला विसरुन आपल्या आयुष्यात पुढे निघून गेली आहे. अधुनाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात तिने आपल्या आयुष्यात आलेल्या नव्या प्रेमाबाबत सांगितले होते. सूत्रांच्या माहितीनुसार अधुना अभिनेता डिनो मोरिया याचा भाऊ निकोलोला डेट करते आहे. निकोलो हा मुंबईतला एक हॉटेल व्यावसायिक आहे. बॉलिवूडमध्ये घटस्फोट होणे ही काय आता नवीन राहिलेले नाही.अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी ही कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. अरबाज आणि मलायका यांनी 18 वर्ष एकत्र संसार केला. अरबाज आणि मलायकाचा संसार वाचवण्यासाठी सलमान खानने अनेक प्रयत्न केले मात्र ते व्यर्थ गेले.