120 Bahadur Box Office: फरहान अख्तरच्या '१२० बहादुर' सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 09:14 IST2025-11-22T09:10:26+5:302025-11-22T09:14:00+5:30
८५ कोटींचं बजेट असलेल्या फरहान अख्तरच्या १२० बहादुर सिनेमाने पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

120 Bahadur Box Office: फरहान अख्तरच्या '१२० बहादुर' सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले 'इतके' कोटी
बहुप्रतिक्षित अॅक्शन-ड्रामा चित्रपट '१२० बहादुर' अखेर काल देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त सुरुवात केली आहे. प्रेक्षकांमध्ये आणि समीक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल जी उत्सुकता होती, ती पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये स्पष्टपणे दिसून आली आहे.
सैकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, '१२० बहादूर'ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २.३५ कोटी (दोन कोटी पस्तीस लाख) रुपयांची कमाई केली आहे. हा आकडा चित्रपटाला मिळालेल्या सकारात्मक 'ओपनिंग'चे संकेत देतो. '१२० बहादुर' या चित्रपटाने केवळ मोठ्या शहरांमधील मल्टीप्लेक्समध्येच नव्हे, तर ग्रामीण भागातील सिंगल स्क्रीन थिएटर्समध्येही चांगली गर्दी खेचली. खासकरून तरुण प्रेक्षकांनी आणि ॲक्शनपटांच्या चाहत्यांनी या चित्रपटाला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद दिला.
समीक्षकांकडून '१२० बहादूर'ला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरी, फरहान अख्तरच्या अभिनयाचं आणि चित्रपटातील थरारक दृश्यांचं विशेष कौतुक होत आहे. पहिल्या दिवसाची चांगली कमाई पाहता, आता वीकेंडला (शनिवार आणि रविवार) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी चांगली कमाई करेल, अशी सर्वांना आशा आहे. '१२० बहादुर'चं बजेट तब्बल ८५ कोटी आहे.
हा चित्रपट वीकेंडच्या अखेरीस २० कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. '१२० बहादूर' आता प्रेक्षकांना किती दिवस चित्रपटगृहांकडे खेचून ठेवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.