फॅट टू फिट झालेला फरदीन खानचा चार्मिंग लूक, नवीन फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 16:43 IST2022-05-05T16:43:02+5:302022-05-05T16:43:33+5:30

Fardeen Khan: फरदीन खानचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फरदीनला जुन्या डॅशिंग लूकमध्ये पाहून चाहते खूश झाले आहेत.

Fardeen Khan's charming look with fat to fit, new photo came in front | फॅट टू फिट झालेला फरदीन खानचा चार्मिंग लूक, नवीन फोटो आला समोर

फॅट टू फिट झालेला फरदीन खानचा चार्मिंग लूक, नवीन फोटो आला समोर

बॉलिवूड अभिनेता फरदीन खान (Fardeen Khan) बऱ्याच दिवसांपासून रुपेरी पडद्यावरुन गायब आहे. मधल्या काळात तो चर्चेत आला होता. वाढलेल्या वजनामुळे त्याला ओळखणंदेखील कठीण झाले होते. त्यावेळी फरदीन खान आजारी असल्याचे अनेकांना वाटत होते. त्याला ओळखणेदेखील कठीण झाले होते. यानंतर फरदीन खानने स्वत:च्या फिटनेसवर असे काम केले की तो पुन्हा जुन्या लूकमध्ये परतला. जुना लूक परत आल्यावर चॉकलेट हिरो फरदीनची बॉलिवूडमध्ये पुन्हा एन्ट्री होणार आहे.

फरदीन खान कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याविषयी आतापर्यंत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र आता हे स्पष्ट झाले आहे की नो एन्ट्री २ या चित्रपटात सलमान खान, अनिल कपूरसोबत फरदीनची एन्ट्री होणार आहे. मात्र यावेळी तो चर्चेत आला आहे कारण ईदच्या दिवशी तो स्पॉट झाला. हुमा कुरैशीच्या ईद पार्टीमध्ये त्याने हजेरी लावली होती. त्यादरम्यानचे त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. फरदीनचे हे फोटो पाहून चाहते कमेंट करत आहेत की माझ्या बालपणीचं प्रेम, माझे क्रश, आता कुठे आहे.

फरदीन खानचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फरदीनला जुन्या डॅशिंग लूकमध्ये पाहून चाहत्यांच्या आनंदातही भर पडली आहे. आता फक्त चाहते फरदीन खानला ऑनस्क्रीन पाहण्याची प्रतीक्षा करत आहे. यापूर्वी फरदीन खानने सांगितले होते की त्याला त्याच्या वडिलांच्या एका हिट चित्रपटाचा रिमेक करायचा आहे. हा चित्रपट कितपत यशस्वी होईल हे माहीत नाही, पण मी त्यांच्यासारखे थोडेसेही करू शकलो तर खूप मोठी गोष्ट ठरेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
फरदीन खान सध्या नो एन्ट्री २ मध्ये दिसण्याची तयारी करत आहे. याशिवाय तो रितेश देशमुखसोबत ब्लास्ट नावाच्या चित्रपटात काम करतो आहे. संजय गुप्ता आणि टी-सिरीज मिळून या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 

Web Title: Fardeen Khan's charming look with fat to fit, new photo came in front