ओळखलंत का? फराह खानचा जुना व्हिडीओ व्हायरल; स्लिम-सुंदर लूक पाहून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:17 IST2025-10-14T15:15:04+5:302025-10-14T15:17:26+5:30
फराह खानचा एक जुना व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

ओळखलंत का? फराह खानचा जुना व्हिडीओ व्हायरल; स्लिम-सुंदर लूक पाहून व्हाल थक्क!
बॉलिवूडमध्ये काही सेलिब्रेटी हे आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. त्यापैकीच एक म्हणजे प्रसिद्ध चित्रपट निर्माती, दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खान. तिचे व्यक्तिमत्त्व साधे पण ग्रेसफुल आहे. फराह खान कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अशातच फराह खानचा एक जुना व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिचा तरुणपणीचा लूक पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये फराह खान खूपच स्लिम (बारीक) दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती एका शिमरी आणि पांढऱ्या रंगाच्या स्टायलिश ड्रेसमध्ये दिसत असून, ती अतिशय सुंदर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, अनेक युझर्सला एका नजरेत ही फराह खान आहे, हे ओळखणे खरोखरच कठीण झाले आहे. हा व्हिडीओ तिच्या सुरुवातीच्या करिअरमधील आहे. फराहच्या तरुणपणीच्या या मनमोहक आणि ग्लॅमरस लूकने सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव
फराह खान आपल्या तरुणपणी अत्यंत सुंदर आणि स्टायलिश दिसायची. या व्हिडीओतील तिचा ग्लॅमरस अंदाज आणि शानदार स्टाईल पाहून चाहते थक्क झाले आहेत. फराह खानच्या या जुन्या व्हिडीओवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. "फराह किती सुंदर दिसायची," "ओळखूच शकलो नाही" आणि "तिची एनर्जी आजही तशीच आहे" अशा प्रतिक्रिया चाहते देत आहेत.
फराहची कारकीर्द
फराह खानची कारकीर्द एखाद्या शानदार चित्रपटापेक्षा कमी नाही. अभिनयाच्या दुनियेत पाऊल न ठेवताही, फराहने आपल्या जबरदस्त टॅलेंटच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वतःची अशी वेगळी जागा निर्माण केली. फराह खानने कोरिओग्राफर म्हणून १९९२ मध्ये आपल्या कामाला सुरुवात केली. आमिर खानच्या 'जो जीता वही सिकंदर' या चित्रपटातील गाणी कोरिओग्राफ करण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात आली आणि फराहने या संधीचं अक्षरशः सोनं केलं. या चित्रपटाच्या गाण्यांना मिळालेल्या तुफान यशामुळे फराहच्या कारकिर्दीला एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि ती यशाच्या पायऱ्या चढत गेली.
'क्वीन ऑफ एंटरटेनमेंट'
आजही फराह खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. सध्या तिचे व्लॉग्स (Vlogs) सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. फराहने एक आगळी वेगळी संकल्पना सुरू केली आहे, ज्यात ती तिचा लाडका कुक दिलीप याला घेऊन विविध सेलिब्रिटींच्या घरी जाते. या व्लॉग्समध्ये फराह सेलिब्रिटींसोबत स्वयंपाकघरात गप्पा मारत धमाल करते आणि त्यांच्यासोबत खास रेसिपीज बनवताना दिसते. हा आगळावेगळा 'सेलिब्रिटी गेस्ट'चा आणि 'होम किचन'चा फंडा चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. फराह खान आता केवळ कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका नसून, ती 'क्वीन ऑफ एंटरटेनमेंट' बनली आहे.