​फराह खान का भडकली कपिल शर्मावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 11:00 IST2017-12-05T05:30:42+5:302017-12-05T11:00:42+5:30

कपिल शर्माचा फिरंगी हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करेल असा कपिल शर्माला ...

Farah Khan's bhadkali Kapil Sharma? | ​फराह खान का भडकली कपिल शर्मावर?

​फराह खान का भडकली कपिल शर्मावर?

िल शर्माचा फिरंगी हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करेल असा कपिल शर्माला विश्वास होता. खरे तर कपिलच्या करियरसाठी हा खूपच महत्त्वाचा चित्रपट आहे. कारण द कपिल शर्मा शो या त्याच्या कार्यक्रमाने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळे छोट्या पडद्यावर सध्या कपिल कुठेच नाहीये. तसेच किस किस को प्यार करू या त्याच्या पहिल्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळवता आले नव्हते. त्यामुळे कपिलला बॉलिवूडमध्ये स्थिरावण्यासाठी फिरंगी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवणे गरजेचे होते. पण या चित्रपटाला समीक्षकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या नाहीत आणि प्रेक्षकांनी तर या चित्रपटाकडे पाठ फिरवली. या चित्रपटाला पहिल्या दोन दिवसांत केवळ ३ करोड ८० लाखांची कमाई करता आली आहे. 
कपिलने या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार केले होते. तसेच या चित्रपटाच्या प्रिमियरला देखील बॉलिवूडमधील अनेकांना बोलावले होते. पण कपिलने प्रिमिअरचे निमंत्रण केवळ व्हॉटसअॅपच्या माध्यमातून दिले असल्याने निर्माता-कोरिओग्राफर फराह खान चिडली आहे. फराह खानने नुकतेच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख न करता फराहने कपिलला चांगलेच सुनावले आहे. तिने ट्वीटच्या द्वारे कपिलला मॅनरलेस म्हटले आहे. फराहने तिच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, प्रिय असभ्य लोकांनो, मी तुमच्या प्रिमियरला, प्रिव्ह्यू, पार्टीला यायला पाहिजे असे तुम्हाला वाटत असेल तर मला व्हॉटसअॅपवर जनता इन्व्हाइट पाठवू नका. तुम्ही निमंत्रण पाठवून माझ्यावर कोणतेही उपकार करत नाही आहात. मी तुमच्या समारंभाला आली पाहिजे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला एक फोन तर नक्कीच करू शकता. जर तुमच्याकडे मला फोन करायला वेळ नसेल तर तुम्हाला काय वाटते माझ्याकडे तयार होऊन तुमच्या कार्यक्रमाला यायला वेळ आहे का?
फराह खानने हे ट्वीट केले त्याच्या दुसऱ्याच दिवशी फिरंगी या चित्रपटाचे प्रिमियर असल्याने फराहने कपिललाच उद्देशून हे ट्वीट केले असल्याचे म्हटले जात आहे. यावर फराह खान सांगते, ते ट्वीट केवळ कपिलसाठी नव्हते. त्या दिवशी आणखी २-३ इव्हेंटदेखील होते. त्या सगळ्यांसाठी माझे हे ट्वीट होते. 

Web Title: Farah Khan's bhadkali Kapil Sharma?