ना दीपिका ना आलिया, बॉलिवूडची नॅचरल ब्युटी कोण? फराह खानने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 10:19 IST2026-01-27T10:18:53+5:302026-01-27T10:19:25+5:30
अभिनेत्रीचं नाव घेताच सोशल मीडियावर चर्चा

ना दीपिका ना आलिया, बॉलिवूडची नॅचरल ब्युटी कोण? फराह खानने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
दिग्दर्शिका, कोरिओग्राफर फराह खान तिच्या युट्यूब व्लॉग्समुळे चर्चेत असते. अनेक सेलिब्रिटींची घरं ती एक्सप्लोर करते. चाहत्यांनाही दाखवते. तसंच त्यांना स्पेशल रेसिपी बनवायला लावते. यामध्ये तिच्यासोबत तिचा कुक दिलीपही असतो. तोही आता सोशल मीडियावर लोकप्रिय झाला आहे. फराह दिलीपची चेष्टा करते आणि सर्वांना हसवते. आता नुकतंच फराहने बॉलिवूडमध्ये नॅचरल ब्यूटी कोण आहे याचा उल्लेख केला. ना दीपिका, ना श्रद्धा आणि ना आलिया; मग तिने कोणाचं नाव घेतलं वाचा.
फराह खानच्या नुकत्याच झालेल्या कुकिंग व्लॉगमध्ये तिने बॉलिवूड अभिनेत्रींच्या सौंदर्यावर भाष्य केलं. 'नॅचरल ब्युटी' नक्की कोण यावर तिने मत मांडलं. व्लॉग सुरु असताना कुक दिलीपने फराहच्या तजेलदार त्वचेची स्तुती केली आणि तिला या त्वचेचं रहस्य काय विचारलं. यावर फराह गंमतीत म्हणाली की माझी तर नॅचरल ब्युटी आहे. यानंतर फराह सांगते, "इंडस्ट्रीत खरीखुरी नॅचरल ब्युटी हिरोईन फार कमी आहेत. ऐश्वर्या रायला सोडलं तर इंडस्ट्रीत कदाचितच कोणी नॅचरल ब्युटी असेल."
फराहच्या या वक्तव्यानंतर युजर्समध्ये डिबेट सुरु झालं. अभिनेत्रींना कॉम्सेटिक ट्रीटमेंट करायला लावलं जातं यावरुन सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. तर काही जण म्हणाले की फराह तर इंडस्ट्रीतलीच आहे त्यामुळे तिला कोण नॅचरल ब्युटी असेल आणि कोण नाही हे माहितच असेल. तर एकाने कमेंट करत लिहिले, 'फराहने ना दीपिका ना आलिया, सोनम, कतरिना कोणाचंच नाव घेतलं नाही. तिला माहित आहे की ब्युटी फक्त ऐश्वर्याच आहे.'