"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 13:18 IST2025-11-21T13:18:08+5:302025-11-21T13:18:39+5:30
सानिया मिर्झाला दिलेल्या मुलाखतीत फराह खानचा खुलासा

"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
कोरिओग्राफर, दिग्दर्शिका फराह खान सध्या तिच्या युट्यूब चॅनल्समुळे चर्चेत असते. फराह तिचा कुक दिलीपसह सेलिब्रिटींच्या घरी जाते आणि रेसिपी शेअर करते. त्यांच्याशी गप्पा मारते आणि त्यांचं आलिशान घरही दाखवते. फराहच्या या चॅनलमुळे तिचा कुक दिलीपलाही खूप लोकप्रियता मिळाली. दरम्यान फराह युट्यूब चॅनलमधून आता तगडी कमाई करते असा तिने नुकताच खुलासा केला.
सानिया मिर्झाच्या पॉडकास्टमध्ये फराह खान म्हणाली, 'मी आता जास्त पैसे कंटेंट क्रिएशनमधून मिळवते. ही गोष्ट खरी आहे.' यावर सानिया हसते आणि म्हणते, 'हे तू बोलत आहेस जिने ३०० कोटींचा सिनेमा केला आहे.(फराह खान दिग्दर्शित 'हॅपी न्यू इयर' सिनेमाने ३०० कोटी कमावले होते)
यावर फराह पुन्हा म्हणते, 'वैयक्तिक सांगायचं कर कंटेंट क्रिएशनमधून मी सर्वात जास्त कमाई करत आहे. पण जर मला विचारशील की मला खरं काय करायचं आहे तर दिग्दर्शन हे माझं पहिलं प्रेम आहे आणि नेहमीच राहील."
फराह खानने काही दिवसांपूर्वीच आणखी एक वक्तव्य केलं होतं. तिला २ मुली आणि १ मुलगा आहे. मुलांच्या पालनपोषणासाठी, त्यांच्या खर्चासाठी मी युट्यूब चॅनल चालवते असं ती म्हणाली होती. नुकतंच आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'सीरिजमधलं 'गफूर' गाणं फराहने दिग्दर्शित केलं होतं.