फराह खानने कुक दिलीपची वाढवली सॅलरी, लाखभर पगारामुळे झाला आनंदी, तर चंकी पांडेने घर, गाडीचं दिलं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 12:25 IST2025-09-20T12:25:29+5:302025-09-20T12:25:49+5:30

Farah Khan And Cook Dilip : प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानने नुकताच एक नवीन व्लॉग शेअर केला आहे, ज्यात ती नेहमीप्रमाणे तिचा कुक दिलीपसोबत मजामस्ती करताना दिसत आहे.

Farah Khan increased the salary of cook Dilip, he was happy with the salary of one lakh, while Chunky Pandey promised a house, a car | फराह खानने कुक दिलीपची वाढवली सॅलरी, लाखभर पगारामुळे झाला आनंदी, तर चंकी पांडेने घर, गाडीचं दिलं आश्वासन

फराह खानने कुक दिलीपची वाढवली सॅलरी, लाखभर पगारामुळे झाला आनंदी, तर चंकी पांडेने घर, गाडीचं दिलं आश्वासन

प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान(Farah Khan)ने नुकताच एक नवीन व्लॉग शेअर केला आहे, ज्यात ती नेहमीप्रमाणे तिचा कुक दिलीप( Cook Dilip)सोबत मजामस्ती करताना दिसत आहे. तिने दिलीपचा पगार १ लाख प्रति महिना वाढवला, पण नंतर 'मस्करी करतेय' असे म्हटले. दुसरीकडे, अभिनेता चंकी पांडेने दिलीपला घर आणि गाडी देण्याचे आश्वासन दिले.

फराह खानने व्लॉग सुरू केल्यापासून, तिच्यापेक्षा तिच्या कुक दिलीपची अधिक चर्चा होते. प्रत्येकजण दिलीपच्या कुटुंबाबद्दल आणि पगाराबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. मागील एका व्लॉगमध्ये फराहने सांगितले होते की, जेव्हा दिलीप तिच्याकडे कामाला लागला, तेव्हा त्याचा पहिला पगार २० हजार रुपये होते, जो आता खूप वाढला आहे. आताच्या लेटेस्ट व्लॉगमध्ये फराहने सांगितले की, तिने दिलीपचा पगार वाढवून १ लाख रुपये प्रति महिना केला आहे. फराह खान आणि दिलीप त्यांच्या लेटेस्ट व्लॉगसाठी अभिनेता चंकी पांडेच्या घरी पोहोचले. दिलीप चंकीच्या 'हाऊसफुल' चित्रपटातील 'आखिरी पास्ता' या पात्रासारखा तयार झाला होता. त्याने विग घातली होती आणि फराहला सांगितले की ते शिरीष कुंदरच्या (फराहचा नवरा) पतीकडून उधार घेतले आहे.

फराहने दिलीपचा वाढवला पगार
यावेळी फराह कुक दिलीपला सांगते की, एकेकाळी तिचे चंकी पांडेवर क्रश होते. ती आणखी काही गोष्टी सांगते, ज्या ऐकून दिलीप मध्येच 'मम्मा मिया' आणि 'आय एम जोकिंग' म्हणत राहतो. हे ऐकून फराह दिलीपला म्हणते, "आजपासून तुझा पगार १ लाख प्रति महिना असेल." हे ऐकून दिलीप खूप आनंदी होतो, पण फराह लगेच म्हणते, "मी मस्करी करतेय."

चंकी पांडेने दिलीपला दिले हे आश्वासन
यानंतर, जेव्हा फराह खान आणि दिलीप दोघे चंकी पांडेच्या घरी पोहोचले, तेव्हा चंकीने दिलीपला त्याच्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला. चंकीने दिलीपला सांगितले की, तो त्याच्याकडे आला तर फराहपेक्षा चांगला पगार देईल. पण दिलीपने नकार दिला. तेव्हा चंकी पांडेने दिलीपला एक घर, एक गाडी आणि स्वतःचा कुक देण्याचे वचन दिले. पण दिलीपने चंकीच्या कुक 'माला'चा प्रस्ताव नाकारला, त्यावर माला चंकीला म्हणाली, "मला काय दिलं?"

अशाप्रकारे फराहला मिळाला होता कुक दिलीप
दिलीपबद्दल बोलायचं झाल्यास, तो आधी अजय देवगण आणि काजोलच्या घरी जायचा कारण तिथे त्याचा भाऊ काम करत होता. तिथेच फराह पहिल्यांदा दिलीपला भेटली आणि तिला त्याला आपल्यासोबत घेऊन आली. तेव्हापासून दिलीप आजपर्यंत फराहसोबत आहे. आधी तो फक्त कुक होता आणि आता फराहसोबत एक व्लॉगर बनला आहे, आणि चांगल्या प्रकारे कमाई करत आहे. फराहमुळे दिलीपसुद्धा एक स्टार बनला आहे.

Web Title: Farah Khan increased the salary of cook Dilip, he was happy with the salary of one lakh, while Chunky Pandey promised a house, a car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.