दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 13:14 IST2025-09-30T13:13:38+5:302025-09-30T13:14:11+5:30
फराह खानने दिलं स्पष्टीकरण, दीपिकाला ८ तासांच्या शिफ्टवरुन मारलेला टोमणा?

दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
सोशल मीडियावर कालपासून सध्या फराह खान आणि दीपिका पादुकोणमध्ये फुट पडल्याच्या चर्चा आहेत. दोघींनी इन्स्टाग्रामवर एकमेकांनी अनफॉलोही केलं आहे. फराह खानने तिच्या युट्यूब व्लॉगमध्ये कुक दिलीपशी बोलताना दीपिकाच्या ८ तासांच्या शिफ्ट मागणीवरुन टिप्पणी केली होती. तसंच याआधीही फराहने दीपिकाच्या या मागणीचा उल्लेख केला होता. यानंतर आज अचानक दीपिकाने फराह खानला सोशल मीडियावर अनफॉलो केल्याची बातमी पसरली. आता या चर्चांवर फराह खानने मौन सोडलं आहे.
पिंकव्हिलाशी बोलताना फराह खान म्हणाली, "आम्ही सुरुवातीपासूनच एकमेकांनी इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाही. 'हॅपी न्यू इयर' शूटिंगवेळीच आम्ही ठरवलं होतं की आम्ही इन्स्टाग्रामवर चॅट करणार नाही. फक्त मेसेज आणि फोनवरच बोलणार. आम्ही इन्स्टाग्रामवर एकमेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत नाही. कारण दीपिकाला ते आवडत नाही."
ती पुढे म्हणाली, "मी ८ तासांच्या शिफ्ट वरुन बोलले तो काही दीपिकाला मारलेला टोमणा नव्हता. मी तसं दिलीपला सांगत होते की आता मी सुद्धा ८ तास काम करणार. जेव्हा की मी खरंतर दोनत तास काम करते. कोणत्याही गोष्टींवरुन वाद घालत बसणं आता बंद व्हायला पाहिजे. गेल्या आठवड्यातही मी आणि करण जोहरने आयुष शर्माकडे दुर्लक्ष केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरुनही वाद झाला. पण खरंतर आम्ही त्याला खालीच भेटलो होतो. कार्पेटवर आमचं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही इतकंच."