THROWBACK: फोटोतील या दोन ‘लेडी सिंघम’ला तुम्ही ओळखलं का? नाव वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 08:00 IST2021-12-23T08:00:00+5:302021-12-23T08:00:02+5:30

THROWBACK : होय, हा फोटो आहे बॉलिवूडच्या दोन ‘लेडी सिंघम’चा. तूर्तास हा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय.

farah khan and geeta kapoor throwback picture viral on internet | THROWBACK: फोटोतील या दोन ‘लेडी सिंघम’ला तुम्ही ओळखलं का? नाव वाचून व्हाल थक्क

THROWBACK: फोटोतील या दोन ‘लेडी सिंघम’ला तुम्ही ओळखलं का? नाव वाचून व्हाल थक्क

बॉलिवूड सेलिब्रिटींचे थ्रोबॅक फोटो म्हणजे चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणीच जणू. आपल्या आवड्यात कलाकारांचे जुने फोटो, जुने किस्से पाहताना चाहते त्यात हरवून जातात. सोशल मीडियाच्या  काळात आपल्या आवडत्या कलाकारांचे जुने फोटो पाहण्याची संधी चाहत्यांना वेळोवेळी मिळते. तूर्तास असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. होय, हा फोटो आहे बॉलिवूडच्या दोन ‘लेडी सिंघम’चा. तूर्तास या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पूर आला आहे. फोटोतील या दोन ‘लेडी सिंघम’ला तुम्ही ओळखलं का?

यातला एक चेहरा कदाचित तुम्ही सहज ओळखू शकाल. पण दुसरा चेहरा ओळखायला तुम्हाला जरा कष्ट पडू शकतात. तुम्हाला अजूनही ओळखता आलं नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो.
तर या ‘लेडी सिंघम’ दुस-या तिस-या कुणी नसून फराह खान (Farah Khan) आणि गीता कपूर (Geeta Kapoor) आहेत. होय, अख्ख्या बॉलिवूडला आपल्या तालावर नाचवणा-या या दोन कोरिओग्राफर्सचा हा फोटो आहे. टी-शर्ट व पॅन्टमध्ये आहे ती फराह खान आहे आणि तिच्या बाजूला निळ्या नऊवारीत पोझ देणारी गीता कपूर अर्थात गीता माँ आहे.

हा फोटो गीता कपूरने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर 2019 मध्ये  शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने फराहला शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मुंबईतील चांदिवली स्टुडिओमध्ये हा फोटो घेण्यात आला होता. सध्या हाच जुना फोटो व्हायरल होतोय.

फोटोत गीता व फराह दोघीही बºयाच स्लीम दिसत आहेत. आताश: त्यांच्यात बराच फरक झाला आहे. 

गीता कपूर आणि फराह खान यांच्या वयात फारसं अंतर नाही परंतु तरीही गीता प्रेमाने आणि आदराने फराहला ‘माँ’ म्हणते. तर आज संपूर्ण देश स्वत: गीताला गीता कपूर नव्हे तर ‘गीता माँ’ या नावाने ओळखतो. 
गीताने वयाच्या अवघ्या 15 वर्षी फराह खानचा ग्रुप जॉइन केला होता. यानंतर तिने फराहसोबत कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, कभी खुशी कभी गम,  मोहब्बते, कल हो न हो, ओम शांति ओम  सोबतच अनेक चित्रपटांमध्ये असिस्टंट म्हणून काम केले.  गीताने   फिजा, अशोका, साथिया, हे बेबी, तीस मार खां आणि तेरे नाल लव हो गया सारख्या चित्रपटांमध्ये कोरिओग्राफी केली आहे. 

सध्या गीता अनेक रिअ‍ॅलिटी डान्स शोची जज म्हणून दिसते.  टीव्हीवर डांस इंडिया डांस,  डीआईडी लिल चँप्स्स  आणि इंडियाज डांसिंग सुपरस्टार या शो ती जज करते.  

Web Title: farah khan and geeta kapoor throwback picture viral on internet