अमिताभ बच्चन यांच्या पार्टीतील माधुरी दीक्षितचा बोल्ड अंदाज पाहून हैराण झाले होते चाहते, पाहा तो फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 19:50 IST2021-08-02T19:50:23+5:302021-08-02T19:50:38+5:30
बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षितची पन्नाशी उलटली असली तरी तिची स्टाईल व अदा आजही घायाळ करतात.

अमिताभ बच्चन यांच्या पार्टीतील माधुरी दीक्षितचा बोल्ड अंदाज पाहून हैराण झाले होते चाहते, पाहा तो फोटो
बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षितची पन्नाशी उलटली असली तरी आजही तिचा अंदाज घायाळ करणारा आहे. मग तिने वेस्टर्न आउटफिट परिधान केलेला असो किंवा ट्रेडिशनल. माधुरी लेटेस्ट फॅशन करण्याला जास्त प्राधान्य देते. बऱ्याचदा ती साडीत पहायला मिळते आणि ती जास्त करून नेकलाइन आणि स्लीव्ज सिम्पल असेल असे ब्लाउज परिधान करते. अशात जेव्हा तिने गोल्डन साडीवर बोल्ड ब्लाउज परिधान केला होता तेव्हा सगळेजण हैराण झाले होते.
हा किस्सा आहे २०१९ सालच्या दिवाळीतील. त्या वर्षी अमिताभ बच्चन यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षित व तिचा नवरा श्रीराम नेनेदेखील उपस्थित होते. त्यावेळी माधुरीने मनीष मल्होत्राने डिझाईन केलेल्या साडीची निवड केली होती.
माधुरीने नेसलेल्या या गोल्डन रंगाच्या साडीवर सीक्वेन्स वर्क करण्यात आले होते. जो या साडीला शाइनी लूक देत होता. पॅपाराजीच्या कॅमेऱ्याचा फ्लॅश पडल्यावर ही साडी झगमगू लागली. त्यात धक धक गर्लच्या स्माईलने तिच्या सौंदर्याला आणखी चार चाँद लावले. माधुरीच्या या गोल्डन साडीसोबत तिच्या बोल्ड ब्लाउजनेदेखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
साधारण स्लीव्जवाल्या ब्लाउजमध्ये दिसणाऱ्या माधुरी दीक्षितने स्ट्रैप्ड ब्लाउज निवडला होता. या साडीला मॅच करण्यासाठी या ब्लाउजवर गोल्डन सीक्वेन्स वर्क होते. माधुरीने अशी साडी नेसली होती की तिच्या या ब्लाउजवर कुणाचे लक्ष जाणार नाही. मात्र याउलटच झाले. साडीऐवजी तिच्या ब्लाउजवर सर्वांचे लक्ष गेले. तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला.