अस्सा नवरा सुरेख बाई ! जेनेलिया सोबतचा रितेश देशमुखचा व्हिडीओ पाहून चाहते म्हणतायेत.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 19:43 IST2021-03-18T19:38:20+5:302021-03-18T19:43:19+5:30
Genelia Deshmukh's Hubby, Riteish Deshmukh Ties Her Hair: काही दिवसांपूर्वी स्केटिंग शिकत असताना पडल्यानं जेनेलियाच्या हाताला दुखापत झाली होती. हाताला प्लास्टर लावण्यात आले आहे.

अस्सा नवरा सुरेख बाई ! जेनेलिया सोबतचा रितेश देशमुखचा व्हिडीओ पाहून चाहते म्हणतायेत.....
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझा इंडस्ट्रीमधील सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. रितेश जेनेलियाची किती काळजी घेतो, हेही कुणापासून लपून राहिलेले नाही. त्यांच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात. काही दिवसांपूर्वी स्केटिंग शिकत असताना पडल्यानं जेनेलियाच्या हाताला दुखापत झाली होती. हाताला प्लास्टर लावण्यात आले आहे.
त्यामुळे जेनेलियाला काम करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे रितेश सध्या जेनेलियाच्या प्रत्येक कामात तिची मदत करत आहे. तिला त्रास होवू नये म्हणून तिची काळजी घेत आहे. समोर आलेल्या व्हिडीओत रितेश जेनेलियाचे केस विंचरताना दिसत आहे.
जेनेलियाने ही दुखापत कशी झाली हे सांगणारा एक व्हिडिओदेखील चाहत्यांसोबत शेअर केला होता. नेहमीच जेनेलिया आणि रितेश त्यांच्या सोशल मीडिया सक्रीय असतात. त्यांची प्रत्येक अपडेट ते चाहत्यांसह शेअर करत असतात.
रेशीमगाठीत अडकण्याआधी दोघे खूप चांगले मित्र होते. ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले. रितेश व जेनिलिया यांच्या लग्नाला नुकतीच 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. मुळात या दोघांची लव्हस्टोरीही खूप इंटरेस्टींग आहे. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले ते त्यांनाच समजले नाही त्यामुळे एकमेकांना कोणी प्रपोज केले हे त्यांना अजूनही लक्षात नाही.
दोघे एकमेकांना भेटायचा नेहमी कारण शोधत आणि सोबत वेळ घालवत.रितेशचे वडील दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे महाराष्ट्रातच्या राजकारणाचे एक मोठे नाव होते. रितेश हिंदू आहे तर जेनेलिया ख्रिश्चन आहे. विलासरावांनी प्रथम या लग्नाला विरोध केला पण कालांतराने रितेशने त्याच्या घरच्यांची संमती मिळवसी आणि जेनेलिया डिसूजाची जेनेलिया देशमुख झाली.
रितेश आणि जेनेलियाने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघे दोन वेळा विवाहबंघनात अडकले. त्यांचे कारण म्हणजे, जेनेलिया ख्रिश्चन आहे आणि रितेश हिंदू. त्यामुळे दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने विवाह थाटला.