'बॉर्डर २' नंतर सनी देओलच्या 'गदर ३'बाबत मोठी अपडेट समोर, अमीषा पटेल म्हणाली- "यावेळी तारा आणि सकिना..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 13:44 IST2026-01-27T13:43:41+5:302026-01-27T13:44:02+5:30
बॉर्डरप्रमाणेच सनी देओलचा २००१ साली प्रदर्शित झालेला 'गदर' सिनेमा सुपरहिट ठरला होता. २०२३ मध्ये या सिनेमाचा सीक्वल 'गदर २' प्रदर्शित करण्यात आला होता. त्यालाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आता 'गदर'च्या पुढच्या भागाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

'बॉर्डर २' नंतर सनी देओलच्या 'गदर ३'बाबत मोठी अपडेट समोर, अमीषा पटेल म्हणाली- "यावेळी तारा आणि सकिना..."
ज्या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो 'बॉर्डर २' सिनेमा अखेर २३ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला. 'बॉर्डर २' ने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. सनी देओलच्या गर्जनेचा आवाज थिएटरमध्ये घुमत आहे. 'बॉर्डर २'नंतर आता सनी देओलच्या 'गदर' सिनेमाच्या सीक्वलबाबत विचारणा होऊ लागली आहे. बॉर्डरप्रमाणेच सनी देओलचा २००१ साली प्रदर्शित झालेला 'गदर' सिनेमा सुपरहिट ठरला होता. २०२३ मध्ये या सिनेमाचा सीक्वल 'गदर २' प्रदर्शित करण्यात आला होता. त्यालाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आता 'गदर'च्या पुढच्या भागाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
'गदर'मध्ये तारा आणि सकिनाची जोडी हिट ठरली होती. प्रेक्षकांनाही ही जोडी आवडली होती. तारा सिंगची भूमिका सनी देओलने साकारली होती. तर सकिनाच्या भूमिकेत अमीषा पटेल होती. 'गदर २'मध्येही तारा आणि सकिना पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यानंतर 'गदर ३'ची आता चाहते प्रतीक्षा करत आहेत. अमीषाने चाहत्यांना 'गदर ३'बाबत अपडेट दिली आहे. अमीषाने नुकतंच ask me सेशन घेतलं होतं. यामध्ये चाहत्याने तिला 'गदर'च्या सीक्वलबाबत विचारलं. "चाहते गदर ३ची वाट पाहत आहेत. तारा आणि सकिना पुन्हा एकत्र कधी पाहायला मिळतील?" असं चाहत्याने विचारलं होतं. चाहत्याच्या या प्रश्नाला अमीषाने उत्तर दिलं आहे.
Trust me whenever fans will see TARA SAKINA in GADAR 3 Godwilling ,, it will create havoc at the box office . Iss baar jab bhi hoga ,, big budget ,, big scale and bigger content 👍👍👍👍👍👍👍BIG DHAMAKA loading for 60 cr plus on day 1 … if and whenever it happens 👍👍❤️🙏🏻🙏🏻 https://t.co/b7gEF5kVN2
— ameesha patel (@ameesha_patel) January 25, 2026
"माझ्यावर विश्वास ठेवा...देवाच्या कृपेने जेव्हा पुन्हा तारा आणि सकिना पडद्यावर दिसतील तेव्हा बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका होईल. यावेळी बिग बजेट आणि आणखी मोठा कंटेट असेल. पहिल्याच दिवशी ६० कोटींच्या वर कमाई करेल", असं उत्तर अमीषाने चाहत्याला दिलं आहे. अमीषा पटेलच्या उत्तरामुळे चाहत्यांना आता 'गदर ३'ची उत्सुकता लागून राहिली आहे.