Video : स्टेजवर गाणं गाताना प्रसिद्ध गायिकेवर चाहत्याने दारू फेकली अन्...; पुढे काय घडलं पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 13:05 IST2023-07-31T13:04:06+5:302023-07-31T13:05:04+5:30

अमेरिकन रॅपरवर कॉन्सर्टदरम्यान चाहत्याने फेकली दारू, संतापलेल्या गायिकेने काय केलं पाहा

fan threw alcohol at american rapper cardi B while performing on stage angry singer throws mike at him video viral | Video : स्टेजवर गाणं गाताना प्रसिद्ध गायिकेवर चाहत्याने दारू फेकली अन्...; पुढे काय घडलं पाहा

Video : स्टेजवर गाणं गाताना प्रसिद्ध गायिकेवर चाहत्याने दारू फेकली अन्...; पुढे काय घडलं पाहा

प्रसिद्ध अमेरिकन रॅपर आणि गायिका कार्डी बी सध्या चर्चेत आली आहे. कार्डी बीचा कॉन्सर्ट दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी (३० जुलै) अमेरिकेतील लॉस एन्जेल्स शहरात कार्डी बीचं कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होतं. या कॉन्सर्टदरम्यान कार्डी बीबरोबर अनुचित प्रकार घडला. एका चाहत्याने कॉन्सर्टमध्ये कार्डी बी वर दारू फेकली.

इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन कार्डी बीच्या कॉन्सर्ट दरम्यानचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. कार्डी बीच्या कॉन्सर्टला चाहत्यांनी प्रचंड गर्दी केल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. कॉन्सर्टमध्ये कार्डी बी स्टेजवर गाणं गात असताना गर्दीमधून एका चाहत्याने तिच्यावर दारू फेकल्याचंही व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. चाहत्याच्या या कृत्यानंतर संतापलेल्या कार्डी बीने गाणं थांबवत हातातील माइक त्याच्यावर फेकून मारल्याचं दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

“वडील गेल्यानंतर त्या १३ दिवसांत...”, रवींद्र महाजनींबद्दलच्या चाहत्याच्या प्रश्नाला गश्मीरचं सडेतोड उत्तर

‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ पाहून संजय जाधव भारावले, म्हणाले, “करण जोहर तुमच्याकडून...”

कार्डी बीच्या कॉन्सर्टमधील या व्हिडिओवर चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी कार्डी बीचं कौतुक केलं आहे. “तिने योग्यच केलं. अशी दारू कोणी कसं काय फेकू शकतं?” अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर दुसऱ्याने “तिच्याशी सहमत आहे. काही लोक खूप चुकीचं कृत्य करतात. खंबीर महिला असल्याची ही लक्षणं आहेत”, असं म्हटलं आहे. “कलाकारांचा अपमान करणं चुकीचं आहे,” अशी कमेंटही केली आहे.

Web Title: fan threw alcohol at american rapper cardi B while performing on stage angry singer throws mike at him video viral