नवरा असावा तर असा! चाहतीने आलिया भटचा हातच पकडला अन्...; पुढे रणबीर कपूरने काय केलं पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 13:28 IST2025-02-26T13:25:50+5:302025-02-26T13:28:44+5:30
फोटोच्या नादात चाहते काय करतील याचं भानही त्यांना अनेकदा राहत नाही. असाच काहीसा प्रकार आलिया भटसोबतही घडला आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे.

नवरा असावा तर असा! चाहतीने आलिया भटचा हातच पकडला अन्...; पुढे रणबीर कपूरने काय केलं पाहा
आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसोबत फोटो काढण्यासाठी चाहते कायम आतुर असतात. फोटोच्या नादात चाहते काय करतील याचं भानही त्यांना अनेकदा राहत नाही. असाच काहीसा प्रकार आलिया भटसोबतही घडला आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे.
आलिया भट ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिचे लाखो चाहते आहेत. अशा एका चाहतीला आलिया बघताच तिच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. पण, मग फोटोसाठी त्या चाहतीने आलियाचा थेट हातच पकडला. एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आलिया आणि रणबीर एकत्र दिसत आहेत. आलियाला पाहताच चाहती तिचा हात धरते आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर रणबीर आलियाला त्या चाहतीपासून प्रोटेक्ट करत असल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
आलिया आणि रणबीरने नुकतीच संजय लीला भन्साळी यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला हजेरी लावली होती. तिथे जात असतानाच हा प्रकार घडला. या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आलियाची काळजी घेत असल्याचं बघून चाहते रणबीरचं कौतुक करत आहेत.