प्रसिद्ध फोटोग्राफर जगदिश औरंगाबादकर यांनी केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 12:37 IST2016-10-13T09:26:30+5:302016-10-17T12:37:19+5:30
प्रसिद्ध फोटोग्राफर जगदिश औरंगाबादकर यांनी गोरेगांवमधील त्यांच्या राहत्या घरात आत्महत्या केली. साधारण साडे बाराच्या सुमारास जेवणाचा डब्बा देण्यासाठी आलेल्या ...

प्रसिद्ध फोटोग्राफर जगदिश औरंगाबादकर यांनी केली आत्महत्या
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small;">प्रसिद्ध फोटोग्राफर जगदिश औरंगाबादकर यांनी गोरेगांवमधील त्यांच्या राहत्या घरात आत्महत्या केली. साधारण साडे बाराच्या सुमारास जेवणाचा डब्बा देण्यासाठी आलेल्या मुलाच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी पंख्याला गळफास लावून आपले जीवन संपवले. पोलिसांनी त्यांचा पार्थिव ताब्यात घेतला असून शवविच्छेदन केल्यानंतर कुटुंबियांकडे तो सुपूर्द करण्यात येईल. जगदिश यांनी अतिशय प्रसिद्ध कलाकारांचे फोटोशूट केले आहे. तसेच सत्तरीच्या दशकातील अनेक चित्रपटांच्या सेटवर त्यांनी फोटो काढले आहेत. कपूर कुटुंबीय, सुनील दत्त यांसारख्या कलाकारांच्या कुटुंबियांचे विविध फोटोही त्यांनी काढले आहेत. त्यांच्याकडे बॉलिवुडमधील कलाकारांच्या फोटोंचा खजिनाच होता असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. जगदिश यांनी सत्तरीच्या दशकात काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकाही साकारल्या होत्या. बॉलिवुडमधील अनेक कलाकारांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.