फॅमिली मॅन मनोज वाजपेयीचं आधीही झालं होतं एक लग्न, वाचा कोण होती अभिनेत्याची पहिली पत्नी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 11:36 IST2022-04-23T11:28:15+5:302022-04-23T11:36:57+5:30
मनोज त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखलं जातं. अभिनेत्याच्या खासगी आयुष्यात बरेच चढ-उत्तार आले.

फॅमिली मॅन मनोज वाजपेयीचं आधीही झालं होतं एक लग्न, वाचा कोण होती अभिनेत्याची पहिली पत्नी?
१९९८ मध्ये प्रदर्शित राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ने मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee)या नावाला नवी ओळख दिली. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यानंतर मनोजने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या फिल्मी कारकिर्दीबाबत आता सर्वानांच माहिती आहे. परंतु त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. आज हा फॅमिली मॅन आपला 53 वा वाढदिवस (Manoj Bajpayee Birthday) साजरा करतो आहे.
मनोज वाजपेयीच्या खासगी आयुष्यात बरेच चढ-उत्तार आले. मनोज त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखलं जातं. आज या अभिनेत्याने चित्रपट, वेबसीरीज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाचा कस दाखवला आहे. परंतु मनोज यांच्या खाजगी आयुष्याबाबत बोलायचं झालं, मनोजने एकदा नाही तर दोनदा लग्न केलं. मनोजने दिल्लीतील एका तरूणीसोबत लग्न केलं होतं. पण फिल्म इंडस्ट्रीतील स्ट्रगल काळात दोघांचं घटस्फोट झाला. नंतर त्याची भेट करीब सिनेमाची अभिनेत्री नेहा(शबाना रजा)सोबत झाली. २००६ मध्ये दोघांनी लग्न केलं. नेहाने 'करीब' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर होगी प्यार की जीत, फिजा, राहुल, आत्मा अशा चित्रपटात ती दिसली. पण तिला जम बसवता आला नाही.
लग्नापूर्वी सुमारे सात वर्षे नेहा व मनोज रिलेशनशिपमध्ये होते. नेहा आणि मनोजला एक मुलगी आहे तिचं नाव नैला आहे. बॉलिवूडला रामराम केल्यानंतर नेहा अनेकवेळा सिनेमांच्या स्पेशल स्क्रिनिंगला पती मनोजसोबत दिसते.