बॉलिवूड सुंदरींसाठी कुटुंबच अग्रस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:39 IST2016-01-16T01:18:31+5:302016-02-08T05:39:31+5:30

ग्लॅमरच्या दुनियेत परंपरांना फारसे स्थान नसले तरी नात्यांमधला ओलावा मात्र कायमच असतो. विषय या रूपेरी दुनियेतील नायिकांचा असेल तर ...

Family heads for Bollywood beauty | बॉलिवूड सुंदरींसाठी कुटुंबच अग्रस्थानी

बॉलिवूड सुंदरींसाठी कुटुंबच अग्रस्थानी

लॅमरच्या दुनियेत परंपरांना फारसे स्थान नसले तरी नात्यांमधला ओलावा मात्र कायमच असतो. विषय या रूपेरी दुनियेतील नायिकांचा असेल तर त्यांच्यातील स्त्रीमन अन् ममता हे पहिले प्राधान्य आपल्या कुटुंबालाच देत असते. अशा अनेक प्रसिद्ध नायिका आहेत ज्यांनी करिअर व कुटुंब या दोघांमधून एकाची निवड करण्याची वेळ आली तेव्हा क्षणाचाही विलंब न करता त्यांनी कुटुंबाची निवड केली. करिअरच्या सर्वोच्च स्थानी असतानादेखील त्यांनी कुटुंबाच्या प्राथमिकेतशी अजिबात तडजोड केली नाही. कोणकोण आहेत यात बघा जरा..
जेनिलिआ डिसूझा- देशमुख : या बबली तरुण अभिनेत्रीने अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य केले. तुझे मेरी कसम, जाने तू या जाने ना, मस्ती, फोर्स या सारखे बॉलिवूडपट व अनेक तामीळ सिनेमातून काम करीत असताना 2012 साली ती रितेश देशमुख सोबत विवाहबद्ध झाली. याच वर्षी दोघांचा तेरे नाल लव्ह हो गया हा सिनेमा प्रदर्शित झाला होता, दोघांच्या जोडीची खूप प्रशंसाही झाली हे विशेष. त्यानंतर ती पत्नी व सूनेच्या रिअल लाईफमध्ये रमली. लग्नानंतर दोन वर्षांनी तिने रियानला जन्म दिला. आता ती पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे.
काजोल देवगन : 24 फेब्रुवारी 1999 साली काजोलने आपल्या चाहत्या अजय देवगनशी विवाह केला. लग्नानंतरही ती सातत्याने सिनेमात काम करीत आहे. क भी खुशी कभी गमचे सेलिब्रेशन सुरू असताना ती प्रेग्नेंट राहिली. 2003 साली न्यासाचा जन्म झाला, मुलांच्या पालन पोषणात ती व्यस्त होती. 2010 साली तिने 'माय नेम इज खान'मधून पुनरागमन केले. शाहरूख 'लकी' असल्याने हा सिनेमातून तिची प्रशंसा झाली. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर काजोलने 'युग'ला जन्म दिला. काजोल पुन्हा एकादा आपल्या संसारात रमली. मात्र चांगल्या अँक्टर्सची नेहमीच बॉलिवूडला गरज असते यामुळेच आता ती रोहित शेट्टीच्या 'दिलवाले'मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
ऐश्‍वर्या राय-बच्चन : विश्‍वसुंदरीचा बहुमान मिळविणार्‍-या ऐश्‍वर्याने आपल्या अभिनय व सौंदर्याच्या बळावर देवदास, हम दिल दे चुके सनम, ताल व धूम 2 या सारख्या चित्रपटातून आपली प्रतिभा सिद्ध केली. याच काळात तिने अभिषेक बच्चन याच्या सोबत ढाई अक्षर प्रेम के, कुछ ना कहो, रावन, धूम 2, गुरू या चित्रपटातून काम केले. टोरँटो येथील गुरूच्या प्रिमियरनंतर अभिषेकने तिला मागणी घातली, अँशने लगेच होकार दिला. 20 एप्रिल 2007 रोजी ते लग्नबंधनात बांधले गेले. लग्नानंतर ऐशने जोधा अकबर या एकमेव चित्रपटात काम केले. 2011 साली तिने मुलगी आराध्याला जन्म दिला. यानंतर ती मुलीला वाढविण्यात व्यस्त झाली. दरम्यानच्या काळात तिचे वजनही वाढले होते, मात्र तिला याची चिंताच नव्हती. आता ती पुन्हा अँक्टिव्ह झाली आहे. याच आठवड्यात तिचा जज्बा हा चित्रपट प्रदर्शित झालाआहे. त्यात तिने आईची भूमिका साकारली आहे.
माधुरी दीक्षित-नेने : बॉलिवूडची चंद्रमुखी म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरीचे चाहते सर्व वयातील प्रेक्षक आहेत. चाहत्यांच्या हृदयाचे तुक डे करीत तिने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी 1999 साली लग्नगाठ बांधली व अमेरिकेला प्रस्थान केले. त्यावेळी ती करिअरच्या उत्कर्षावर होती. 

Web Title: Family heads for Bollywood beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.