अभिनेत्रीनं बालपणापासून सोसलं दु:ख, वैयक्तिक आयुष्यातही आलं अनेक चढ-उतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 11:19 IST2023-06-03T08:00:00+5:302023-06-03T11:19:41+5:30

अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक चढ-उतारा आले. यशाच्या शिखरावर असताना सारिका विवाहित कमल हसन यांच्या प्रेमात पडली.

Falling in love with a married man, the actress changed her religion and broke up in 16 years | अभिनेत्रीनं बालपणापासून सोसलं दु:ख, वैयक्तिक आयुष्यातही आलं अनेक चढ-उतार

अभिनेत्रीनं बालपणापासून सोसलं दु:ख, वैयक्तिक आयुष्यातही आलं अनेक चढ-उतार

बॉलिवूड दुनियेत सारिका हे नाव आजही अभिनयासाठी तितकेच आदराने घेतले जाते.  2022मध्ये आलेल्या 'ऊंचाई' सिनेमात सारिका झळकली होती. सारिकाच्या आयुष्यात अनेक चढ-उतारा आले. सारिकाने इंडस्ट्रीमधील आतापर्यंत सगळ्यात यशस्वी बालकलाकार आहे. घरची परिस्थिती फारशी ठीक नव्हती. आई-वडील वेगळे झाले होते. पैशासाठी आई तिला सिनेमात काम करायला लावायची.  

 एकदा, जेव्हा सारिकाने कामाच्या बदल्यात मिळालेल्या 1500 रुपयांमधून पुस्तके विकत घेतली, तेव्हा आईने तिला बेदम मारले होते. शेवटी आईच्या वागणुकीला कंटाळून तिने घर सोडले. बालकलाकार म्हणून तिच्या कामासाठी मिळालेल्या पैशातून मुंबईत पाच अपार्टमेंट खरेदी केले गेले. मात्र यातील एकही तिच्या नावावर नव्हते हे जेव्हा सारिकाला कळले तेव्हा ती आतून खचली गेली. त्याच दरम्यान कमल हसनची एंट्री तिच्या आयुष्यात झाली, कसलाही विचार न करता ती त्यांच्यासोबत राहू  लागली. सिनेमा सोडून ती चेन्नईला शिफ्ट झाली. 


तिचे करिअर यशाच्या शिखरावर असताना कमल हसन यांच्या प्रेमात बुडालेल्या सारिकाने सगळे काही सोडले होते.
कमल हासन आणि सारिका भेटले तेव्हा कमल हसन विवाहीत होते. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वाद-विवाद सुरु होते. सारिका आणि कमल हसन लिव्ह-इनमध्ये रहायला लागले. सारिका लग्नाच्या आधीच प्रग्नेंट झाली होती त्यानंतर दोघांनी लग्न केले. .त्यांना श्रुती आणि अक्षरा या दोन मुली आहेत. पण लग्नाच्या काही वर्षात कमल सारिकापासूनही विभक्त झाले.

 

Web Title: Falling in love with a married man, the actress changed her religion and broke up in 16 years