श्रद्धा झाली पुन्हा जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 17:39 IST2016-07-20T12:09:11+5:302016-07-20T17:39:11+5:30

 श्रद्धा कपूर वांद्रे येथील मेहबूब स्टुडीओमध्ये नुकतीच एका ब्रँडच्या जाहीरातीसाठी शूटींग करत होती. तेव्हा कार्पेटवरून जाताना ती पाय घसरून ...

Faith was again injured | श्रद्धा झाली पुन्हा जखमी

श्रद्धा झाली पुन्हा जखमी

 
्रद्धा कपूर वांद्रे येथील मेहबूब स्टुडीओमध्ये नुकतीच एका ब्रँडच्या जाहीरातीसाठी शूटींग करत होती. तेव्हा कार्पेटवरून जाताना ती पाय घसरून पडली. तेही तिच्या गुडघ्यांवरच. नंतर मात्र शुटींग बाजूला ठेवून तिला हॉस्पिटलाईज करण्यात आले.

तिच्या हाताला बँडेज केले. आत्तापर्यंत तिने खुप वेळेस स्वत:ला जखमी करून घेतले आहे. असे म्हणायला हरकत नाही की, ती नेहमी अपघाताला आमंत्रण देत असते. मागील महिन्यात तिच्या पायालाही प्रचंड मोठी दुखापत करण्यात आली होती.

‘हाफ गर्लफ्रेंड’ मध्ये बास्केटबॉल सीन करताना तिला गंभीर दुखापत झाली होती. तसेच ‘बागी’,‘ रॉक आॅन २’, ‘एक विलेन’ आणि  ‘एबीसीडी २’च्या शूटींगवेळी तिने स्वत:लाच जखमी करून घेतले.

Web Title: Faith was again injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.